ओटीटी प्लॅटफॉर्मची सर्वात जास्त चलती ही आपल्याच देशात आहे. कोविड काळानंतर ओटीटीवरील कंटेंट बघणाऱ्या लोकांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक उत्तम आणि परवडणारा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे एमएक्स प्लेअर. सुरुवातीला फक्त व्हिडिओ प्लेअर म्हणून वापरल्या जाणाऱ्या या प्लॅटफॉर्मचं रूपांतर भारतातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये झालं.

कित्येक उत्तमोत्तम सीरिज या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या. आता अशीच आणखी एक आगामी सीरिज या प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि तिथली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजचा टीझर नुकताचा प्रदर्शित झाला होता. आता याचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमधून धारावीमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी उलगडणार आहे.

आणखी वाचा : ‘हे’ ऐतिहासिक चित्रपट अडकले होते वादाच्या भोवऱ्यात; इतिहासाची मोडतोड केल्याचे झालेले आरोप

आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ज्या धारावीकडे पाहिलं जातं तिथे आत नेमकी काय काय रहस्यं दडली आहेत हे या वेबसीरिजमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेबसीरिज ही काल्पनिकच आहे पण वास्तवातील बरेच संदर्भ या सीरिजमध्ये आढळणार आहे. झोपडपट्टी हे गुन्हेगारांचं मोक्याचं ठिकाण असतं आणि नेमकं तेच हेरून समीत कक्कड यांनी एक उत्तम क्राइम थ्रिलर प्रेक्षकांसमोर आणल्याचं ट्रेलरमधून जाणवतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय अभिनेता सुनील शेट्टी या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. गुन्हेगारी विश्वाचा सर्वेसर्वा ‘थलाईवन’ हे पात्र सुनील शेट्टीने साकारलं आहे. याबरोबरच विवेक ओबेरॉयसुद्धा यामध्ये जेसीपी जयंत गावस्कर या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चोर पोलिसाचा हा खेळ धारावीच्या गुन्हेगारी विश्वाच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकणार असल्याचं स्पष्ट होत आहे. शिवाय सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, नागेश भोसले, चिन्मय मांडलेकरसारखे मराठी कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १९ नोव्हेंबरला ही वेबसीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.