अॅमेझॉन प्राईमवरील वादग्रस्त ठरलेली वेबसीरिज म्हणजे ‘तांडव’, याच वेबसीरिजच्या संदर्भात एका मोठी बातमी समोर आली आहे. ‘तांडव’ वेबसीरिजच्या प्रकरणात अॅमेझॉन प्राईमच्या इंडिया ओरिजिनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात हा निकाल दिला गेला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने पुरोहित तपासात सहकार्य करत असल्याचे लक्षात घेऊन दिलासा दिला.

मागच्या जानेवारी महिन्यात अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘तांडव’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी देशभरातून या सीरिजला विरोध करण्यात आला. या वादग्रस्त वेबसीरिजविरूध्द पुरोहित यांच्यावर एफआयर दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी ५ मार्च २०२१ रोजी पुरोहित यांना अटक होण्यापासून संरक्षणही दिले होते.

“तू योद्धा…”; लेकाचं कौतुक करत अनुपमा फेम अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

खंडपीठातील न्यायमूर्तींच्या मते, केलेली विधान लक्षात घेता, आम्ही अंतरिम आदेशाची पुष्टी करतो आणि निर्देश देतो की याचिकाकर्ती अपर्णा पुरोहित यांना अटक झाल्यास, त्यांना अटक अधिकारी/ट्रायल कोर्टाने निश्चित केलेल्या अटी व शर्तींवर जामिनावर सोडले जाईल. असे नमूद केले आहे.

विराटने अनुष्काला प्रपोज केलेच नव्हते; लग्नाच्या निर्णयावर दिले होते स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने २७ जानेवारी २०२१ रोजी वेबसीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना कोणत्याही सक्तीच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.