ओटीटीवर जगभरातील चित्रपट, वेब सीरिज व शो पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दर आठवड्याला ओटीटीवर अनेक नवीन कलाकृती प्रदर्शित होत असतात. काही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर येतात; तर काही थेट ओटीटीवर प्रदर्शित केले जातात. यापैकी काहींना ओटीटीवर प्रचंड यश मिळतं.
आता नेटफ्लिक्सने सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १० चित्रपटाची यादी जाहीर केली आहे. या १० चित्रपटांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सिनेमाला तर थिएटरमध्येही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. थिएटरमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. तब्बल १,०९५ दिवसांपासून नेटफ्लिक्सवर ट्रेडिंग आहे.
नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर असलेला चित्रपट हा RRR आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित या सिनेमात राम चरण व ज्युनिअर एनटीआर यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. अभिनेत्री आलिया भट्टही या सिनेमात होती. टॉप १० सिनेमांच्या यादीत काही बॉलीवूड चित्रपटांचाही समावेश आहे.
नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट
RRR हा भारतात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट आहे. या ब्लॉकबस्टरने बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली होती. याला OTT वर जबरदस्त व्ह्यूज मिळाले. आतापर्यंत ४३.६५ मिलियन लोकांनी RRR ओटीटीवर पाहिला आहे. यासह, हा नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय चित्रपट बनला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खानचा सिनेमा
अॅटली दिग्दर्शित शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बॉक्स ऑफिसवर ६४० कोटी रुपयांची कमाई करणारा ‘जवान’ ओटीटीवर मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. ‘जवान’ हा बॉलीवूडचा नंबर १ चित्रपट आहे ज्याला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. नेटफ्लिक्सवर ‘जवान’ला ३१.९० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप 10 चित्रपट
आरआरआर (हिंदी) – ४३.६५ मिलियन
जवान – ३१.९० मिलियन
गंगूबाई काठियावाड़ी – २९.६४ मिलियन
लापता लेडीज़ – २९.५० मिलियन
अॅनिमल – २९.२० मिलियन
क्रू – २७.२० मिलियन
महाराजा – २७.१० मिलियन
फायटर – २६.३० मिलियन
लकी भास्कर – २६.३० मिलियन
शैतान – २४ मिलियन
ही नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या भारतीय चित्रपटांची यादी आहे.