scorecardresearch

Video: वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर शिल्पा तुळसकरचा रोमान्स; वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसली इंटिमेट सीनची झलक

शिल्पा तुळसकर मालिकेनंतर आता वेब सीरिजमध्ये करणार रोमान्स; इंटिमेट सीनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Video: वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर शिल्पा तुळसकरचा रोमान्स; वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसली इंटिमेट सीनची झलक
शिल्पा तुळसकरने वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन दिले आहेत. (फोटो: शिल्पा तुळसकर/ इन्स्टाग्राम)

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा तुळसकर ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती प्रमुख व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेता स्वप्नील जोशी नायकाच्या भूमिकेत आहे. शिल्पाने या मालिकेत स्वप्नीलबरोबर इंटिमेट सीन दिले होते. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

मालिकेत बोल्ड सीन दिल्यानंतर आता शिल्पा वेब सीरिजमध्ये रोमान्स करताना दिसणार आहे. ‘हसरत’ असं वेब सीरिजचं नाव असून याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या वेब सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून शिल्पानो दिलेल्या बोल्ड सीनची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

हेही वाचा>> अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी अजय देवगण उत्सुक, ट्वीट करत म्हणाला…

हेही वाचा>>राणादा-पाठकबाईंच्या रिसेप्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला अन्…; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

शिल्पा तुळसकर या सीरिजमध्ये वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर शिल्पा रोमान्स करताना दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये सीरिजमधील तिच्या इंटिमेट सीनची झलक दिसली आहे. १२ डिसेंबरपासून ‘हंगामा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा>> महापरिनिर्वाण दिनी गौरव मोरेची खास पोस्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शेअर करत म्हणाला…

शिल्पाने मराठी चित्रपट व मालिकांत काम करुन प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप सोडली. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 17:35 IST

संबंधित बातम्या