urmila matondkar to make her ott debut with tiwari her upcoming web series | Loksatta

उर्मिला मातोंडकर दिसणार ‘या’ वेब सीरिजमध्ये अ‍ॅक्शन अवतारात; पोस्टर पाहिलंत का?

या सीरिजच्या माध्यमातून उर्मिला पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.

उर्मिला मातोंडकर दिसणार ‘या’ वेब सीरिजमध्ये अ‍ॅक्शन अवतारात; पोस्टर पाहिलंत का?
उर्मिलाने 'तिवारी' या तिच्या वेब सीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटीवर एकापेक्षा एक दर्जदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अनेक गुणी कलाकारांसाठी ओटीटी हे माध्यम नवसंजीवनी ठरले आहे. या माध्यमाद्वारे नव्वदीच्या दशकातील बऱ्याच अभिनेत्रींनी मनोरंजन क्षेत्रामध्ये कमबॅक देखील केले आहे. माधुरी दीक्षित, रवीना टंडन, सुष्मिता सेन यांच्याप्रमाणे अभिनेत्री उर्मिला मातोडकर देखील ओटीटी विश्वामध्ये पदार्पण करणार आहे. उर्मिलाने ‘तिवारी’ या तिच्या वेब सीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या पोस्टरमध्ये उर्मिला एका वेगळ्याच अवतारामध्ये आहे. तिच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर धूळ-माती आहे. तिच्या हातावर झालेल्या जखमा स्पष्टपणे दिसत आहेत. उजव्या हातातील फाटलेला रुमाल तिच्या तोंडासमोर आहे. महायुद्ध किंवा वायुगळती झाल्यावर ज्या पद्धतीचे मास्क घातले जातात, तसे मास्क घातलेले लोक तिच्या पाठीमागे उभे आहेत. या पोस्टरमध्ये “या वेळी शेवटी उरणारी व्यक्ती एक महिला आहे” असे लिहिलेले आहे. एकूणच पोस्टरवरुन ही वेब सीरिज अ‍ॅक्शनपटप्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी उर्मिलाने घेतलेली शारीरिक मेहनतही दिसून येत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 16 : साजिद खानला पाठिंबा दिल्याने अभिनेत्री कश्मिरा शाह झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले, “तुझ्याइतकी ढोंगी…”

‘तिवारी’ वेब सीरिजबद्दलची माहिती देताना उर्मिला म्हणाली की, “मी याआधी या प्रकारची भूमिका साकारली नव्हती. या कथेमुळे आणि भूमिकेमुळे एक कलाकार म्हणून काहीतरी नवीन करायची संधी मला मिळाली. या सीरिजच्या तरुण लेखकांनी स्क्रिप्ट वाचताना मला शेवटपर्यंत खेळवून ठेवले. आई आणि तिच्या लेकीमधील नातं यावर आधारलेल्या या सीरिजमध्ये अनेक अ‍ॅक्शन सीन्सदेखील आहेत. कथा जसजशी पुढे जाते तसतसे त्यात येणारे ट्विस्ट वाढत जातात. या वेब सीरिजच्या चित्रीकरणासाठी मी फार उत्सुक आहे”

आणखी वाचा – ‘आशिकी’ चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेला राहुल रॉय म्हणाला, “आशिकी ३ साठी कार्तिक आर्यनला…”

सौरभ वर्मा हे या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. तर कॉन्टेंट इंजीनिअर्स या निर्मिती संस्थेद्वारे या सीरिजची निर्मिती केली जाणार आहे. या सीरिजमध्ये उर्मिला मातोंडकरने साकारलेल्या भूमिकेचे नाव मुद्दामून ‘तिवारी’ असे ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“नव्वदच्या दशकात सेटवर पुरुषांची… ” अभिनेत्री जुही चावलाने केला खुलासा

संबंधित बातम्या

“एवढी सोन्यासारखी बायको असताना…” विकी कौशल आणि कियारा आडवाणीचा बाथटबमधील रोमान्स पाहून नेटकऱ्यांचा संताप
टक्कल, पाण्याने भरलेले डोळे अन्…; निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला फोटो ठरतोय चर्चेचा विषय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबईमध्ये गोवरचा आणखी एक बळी
२५ पोलीस अधीक्षक-उपायुक्तांच्या बदल्या 
पर्यावरण संवर्धनासाठी छोटीशी कृतीही महत्त्वाची; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव प्रवीण दराडे यांचे मत
लिपिक, टंकलेखक पदांसाठी जानेवारीत जाहिरात
करोना लसीने मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई नाही!; केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र