सिद्धहस्त लेखक जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि मराठी रंगभूमी गाजवणारं पुरुष नाटक पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण या नाटकावर आधारित वेब सीरिज आता प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. पुरुष हे नाटक लेखक जयवंत दळवी यांनी पुरुषी मनोवृत्ती आणि खासकरुन ज्यांचा उल्लेख गेंड्याची कातडी असलेला पुढारी असा केला जातो अशा लोकांची मानसिकता ही कशी असते हे दाखवणारं नाटक होतं. हे नाटक जेव्हा रंगभूमीवर आलं तेव्हा नाटकात गुलाबराव जाधव हे पात्र नाना पाटेकरांनी साकारलं होतं. तर अंबू हे पात्र रिमा लागू यांनी साकारलं होतं.

पुरुष या नाटकाचं कथानक काय?

पुरुष या नाटकाची नायिका अंबिका आहे. तिचे वडील शिक्षक आहेत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. एका शिक्षकाच्या घरातली संस्कारक्षम मुलगी पुरुष प्रधान संस्कृतीशी बरोबरी करु पाहते. समाजातल्या पुरुषांबरोबर खांद्याला खांदा मिळवून काम करु पाहते. हे सगळं गुलाबराव जाधव या निर्ढावलेल्या पुढाऱ्याला बघवत नाही. एका पुरुषी अहंकारातून तो तिच्यावर बलात्कार करतो. इतक्या मोठ्या आघाताने अंबिका खचून जाईल असं गुलाबराव जाधवाला वाटत असतं पण तसं घडत नाही. उलट ती त्याला धडा शिकवते. असं या नाटकाचं थोडक्यात कथानक आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Anasuya Sengupta win Best Actress at Cannes
अनसूया सेनगुप्ताने Cannes मध्ये रचला इतिहास, ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Amey Khopkar
“…हा मनसेचा शब्द आहे”, दामोदर नाट्यगृहासाठी अमेय खोपकरांचा मुंबई पालिकेला इशारा; म्हणाले, “कुटील डाव कधीही…”

१९८२ मध्ये आलं होतं नाटक

१९८२ मध्ये हे नाटक सर्वात आधी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. नाना पाटेकर, रिमा लागू, चंद्रकांत गोखले, उषा नाडकर्णी, सतीश पुळेकर अशा दिग्गज कलाकारांच्या या नाटकांत भूमिका होत्या. नाटक आल्यापासूनच प्रेक्षकांना खूप भावलं. या नाटकावर आधारित एक हिंदी चित्रपटही आला होता. तसंच ९० च्या दशकानंतर या नाटकाचे हिंदी प्रयोगही झाले. ज्यात अंबिकाची भूमिका आयेशा झुल्काने केली होती. पुरुष या नाटकातला गुलाबराव नाना पाटेकरने त्याच्या अभिनयाने अजरामर केला आहे. या नाटकाचे काही प्रयोग मोहन जोशींनीही केले होते. युट्यूबवर व्हिडीओ रुपात जे नाटक आहे त्यातला गुलाबराव मोहन जोशीच आहेत. आता वेबसीरिजच्या रुपात पुरुष नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. प्लॅनेट मराठीतर्फे ही वेबसीरिज आणण्यात येते आहे.

सचिन खेडेकर गुलाबराव साकारणार?

वेबसीरिजचा प्रोमो प्लॅनेट मराठीच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. फोनवरच्या संवादाने या प्रोमोची सुरुवात होते. संवाद ऐकतानाच वेबसीरिज पुरुषप्रधान असणार आहे हे समजतं कारण नाटकही तसंच होतं. आता या वेबसीरिजमध्ये गुलाबराव आणि अंबिका ही दोन पात्रं कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.प्रसन्न आजरेकर, श्रीरंग गोडबोले आणि अभिजित पानसे पुरुष ही वेबसीरिज घेऊन येत आहेत. प्लॅनेट मराठी या ओटीटी अॅपवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. अक्षय बर्दापूरकर यांनी सीरिजची निर्मिती केली आहे. सचिन खेडेकर गुलाबरावच्या भूमिकेत आणि मृण्मयी देशपांडे अंबिकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.