जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर यांच्या या चित्रपटाला भारतात आधीच विरोध होत होता.

‘अबीर गुलाल’ हा सिनेमा ९ मे रोजी रिलीज केला जाणार होता. फवाद खानसोबत या सिनेमात बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर स्क्रीन शेअर करणार होती. पण, आता सिनेमावरच बंदी घालण्यात आल्यामुळे फवाद खानसोबतच इतरही पाकिस्तानी सेलिब्रिटींसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

आता सरकारनं या चित्रपटाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट आता भारतात प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटातील गाणीही यूट्यूब इंडियावरून डिलीट करण्यात आली आहेत.

‘खुदाया इश्क’ आणि ‘अंग्रेजी रंगरसिया’ ही गाणी केली डिलीट

‘अबीर गुलाल’ हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण भारतात त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, या चित्रपटाशी संबंधित प्रमोशनल कंटेंटदेखील भारतीय प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे. या चित्रपटातील ‘खुदाया इश्क’ आणि ‘अंग्रेजी रंगरसिया’ ही दोन गाणीही आता यूट्यूब इंडियावरून डिलीट करण्यात आली आहेत.

भारतीय प्रेक्षकांसाठी उपलब्ध नाहीत गाणी


मूळ गाण्याचे व्हिडीओ ‘अ रिचर लेन्स एंटरटेन्मेंट’ या प्रॉडक्शन हाऊसच्या अधिकृत चॅनेलवर अपलोड केले गेले होते. आता ही गाणी भारतीय प्रेक्षकांसाठी उपलब्ध नाहीत. त्याशिवाय सारेगामानेही त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरून ही गाणी काढून टाकली आहेत. या संदर्भात निर्माते आणि चित्रपटातील कलाकारांकडून कोणतेही अधिकृत विधान जारी केले गेलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाणी कपूरला ट्रोलिंग

वाणी कपूरला सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. वाणी कपूरने २२ एप्रिल रोजी शेअर केलेला प्रमोशनल व्हिडिओ डिलीट केला, ज्यामध्ये ती फवाद खानसोबत दिसली होती. पहलगाममध्ये हल्ला झाला तोच हा दिवस होता. सोशल मीडियावर #boycottvaanikapoor ट्रेंड होऊ लागला आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाद्वारे फवाद खान ९ वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतणार होता.