पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि छोट्या पडद्यावरील सुत्रसंचालक आमिर लियाकत हुसैन सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. हा एक डान्स व्हिडीओ असून यात डान्स करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून आमिर लियाकत आहे असे म्हटले जात आहे. या व्हिडीओत आमिर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या गाण्यावर डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आमिर लियाकत हुसैन यांचा हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी टिप-टिप बरसा पानी या गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला आमिर दोन मुलींसोबत एण्ट्री करताना दिसत आहे. त्यानंतर आमिर यांनी डान्स करायला सुरुवात केल्यानंतर त्या दोघी निघून जातात.

आणखी वाचा : झुलन गोस्वामींच्या बायोपिकमधून अनुष्का करणार कमबॅक, पण टीझर पाहताच नेटकरी म्हणाले…

आणखी वाचा : शिवानी रांगोळे होणार या लोकप्रिय अभिनेत्रीची सून, केली साखरपुड्याची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आमिर यांनाच ट्रोल केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला त्याला ट्रोल केले आहे. दरम्यान, या व्हिडीओत डान्स करणारी व्यक्ती ही आमिर लियाकत हुसैन नाही तर शोएब शकूर आहे. शोएब शकूर हा एक प्रोफेशनल डान्सर आहे. त्याने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. एवढचं काय तर शोएब शकुरचा हा व्हिडीओ फेसबूकवर पण प्रचंड व्हायरल झाला आहे.