शेफाली जरीवालाच्या अचानक निधनाने संपूर्ण मनोरंजन उद्योगाला धक्का बसला होता. पत्नी शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पराग त्यागीलाही बरे होण्यासाठी बराच वेळ लागला. अनेकदा चाहते त्याला सहानुभूती आणि प्रेम देऊन प्रोत्साहन देतात.
आता अलीकडेच पराग त्यागीने शेफाली जरीवालाची आठवण आपल्या हृदयात जपून ठेवत शेफाली जरीवालाचा टॅटू काढला आहे. पराग त्यागीने त्याच्या छातीवर शेफालीच्या चेहऱ्याचा टॅटू बनवला आहे. व्हिडीओमध्ये पराग त्यागी टॅटू काढून घेताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी त्याने त्याच्या छातीवर त्याच्या दिवंगत पत्नी शेफाली जरीवालाच्या फोटोचा टॅटू काढला आहे हे तुम्ही पाहू शकता.
व्हिडीओमध्ये टॅटू कलाकार पराग त्यागीबरोबर या प्रोजेक्टचा भाग बनून, त्याला खूप भाग्यवान वाटत असल्याचे सांगत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि वापरकर्ते त्यावर प्रेमाचा वर्षावदेखील करीत आहेत. पराग त्यागी खऱ्या प्रेमाचे उदाहरण देत असल्याचे अनेक लोक म्हणतात.
शेफाली जरीवालाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले
१२ ऑगस्ट रोजी पराग त्यागीने शेफाली जरीवालाशिवाय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आणि यावेळी त्याने त्याच्या दिवंगत पत्नीच्या अपूर्ण स्वप्नाबद्दल प्रेक्षकांना सांगितले. अभिनेत्याने चाहत्यांबरोबर शेअर केले की, शेफाली नेहमीच लहान मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी एक एनजीओ उघडू इच्छित होती.
लग्नाचा वाढदिवसानिमित्त पराग त्यागीने शेफाली जरीवाला राईज फाउंडेशन फॉर गर्ल्स एज्युकेशन अँड वूमन एम्पॉवरमेंट नावाच्या एका फाउंडेशनची नोंदणी केली. आता या माध्यमातून त्याने एका मुलीला शाळेत प्रवेश दिला आहे आणि त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली. या फाउंडेशनला निधी देण्यासाठी पराग त्यागीने यूट्यूबवर एक पॉडकास्ट चॅनेलदेखील सुरू केले आहे.
मनोरंजन विश्वाला काही महिन्यांपूर्वी मोठा धक्का बसला होता, जेव्हा लोकप्रिय अभिनेत्री शेफाली जरीवाला अचानक या जगातून निघून गेली. शेफाली जरीवालाच्या अचानक निधनानंतर तिचा पती अभिनेता पराग त्यागी पूर्णपणे तुटून गेला होता; पण आज तोच पराग आपल्या पत्नीच्या आठवणींना जिवंत ठेवण्यासाठी धडपडत आहे. मृत्यूने शरीर वेगळे केलं; पण त्याच्या मनातून शेफाली कधीच दूर गेलेली नाही.