बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते परेश रावल सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सामाजिक विषयांवर उघडपणे त्यांचे मत मांडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारला पाठिंबा देत त्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेले ट्विट चर्चेत आहे.

परेश राव यांनी ट्विटमध्ये सध्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही दिवस लोकं सेल्फी घेण्यासाठी विचारण्याची हिम्मत करणार नाहीत आणि त्यासाठी त्रासही देणार नाहीत असे म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहते त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. संसर्गातून पसरणाऱ्या या व्हायसरचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे परेश रावल यांनी पुढचे काही दिवस लोकं जवळ येऊन सेल्फी घेण्याची हिम्मत करणार नाहीत असे म्हटले असावे.

त्यांच्या या ट्विटवर एका यूजरने लोकं तुम्हाला तरीही विचारतील पण त्यांच्यासोबत सेल्फी काढायची तुमची हिम्मत होणार नाही असे म्हटले आहे.

तर दुसऱ्या एका चाहत्याने त्यावर उपाच सुचवत रिप्लाय दिला आहे. ‘बाबु भंया, सेल्फीस्टीक आहे ना’ असे म्हटले आहे.

एका यूजरने तुमच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये तयार असल्याचे म्हटले आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर परेश रावल यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. लवकरच ते ‘हंगामा २’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि जावेद जाफरीा मुलगा मीजन जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त परेश रावल ‘हेरा फेरी ३’मध्ये देखील दिसणार आहेत.