Patralekhaa On Pregnancy : बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा हे आई-वडील होणार आहेत. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने इन्स्टाग्रामवर जगाला ही आनंदाची बातमी दिली होती.

त्यांनी सांगितले की ते खूप उत्साहित आहेत. लग्नाच्या चार वर्षांनंतर ‘सिटीलाईट’ अभिनेत्री आई होणार आहे. तिने एका मुलाखतीत या टप्प्याबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की, बाळाच्या स्वागतासाठी तिने कामातून ब्रेक घेतला आहे. ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. याबरोबरच तिने बाळाच्या आगमनानंतर त्याच्याबरोबर बंजी जंपिंग करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे.

पत्रलेखाने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितले आहे. तसेच तिने राजकुमार राव या काळात तिची विशेष काळजी घेत आहे हे देखील सांगितले. पत्रलेखाने आई झाल्यानंतर तिच्या बाळाबरोबरच्या पहिल्या प्रवासाचा खुलासाही केला.

पत्रलेखाने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, तिला सध्या खूप थकवा जाणवत आहे. तिने सांगितले की बाळ येईपर्यंत ती शूटिंग करणार नाही, “मी पुढील ६-७ महिने शूटिंग करणार नाही. मी फक्त घरीच राहीन.”

पत्रलेखाचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस

अभिनेत्री पत्रलेखाने पुढे सांगितले की तिचा एक प्रोजेक्ट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, ज्यासाठी ती खूप उत्सुक आहे; त्याचे पोस्टर लवकरच प्रदर्शित होईल. अभिनेत्रीच्या मते, हा प्रोजेक्ट तिच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. तिने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अनेक वर्षांपूर्वी दोघांनीही स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस उघडण्याचे स्वप्न पाहिले होते, जे आता प्रत्यक्षात येत आहे, म्हणूनच वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही दृष्टीने हे खास आहे.

पत्रलेखा राजकुमार रावबद्दल काय म्हणाली?

राजकुमार राव पत्रलेखाची काळजी कशी घेत आहेत याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा आम्ही दोघेही अलीकडेच न्यूझीलंडला गेलो होतो, तेव्हा त्याने तिथे माझी खूप काळजी घेतली. मला काय खायचे मन करत आहे हे जाणून घेण्याचा त्याने सर्वतोपरी प्रयत्न केला आणि हे पाहून मी म्हणू शकते की राज एक चांगला वडील बनेल. तो एक उत्तम जोडीदार आहे आणि या प्रवासादरम्यान हे आणखी सिद्ध झाले आहे. आम्ही दोघे विचार करत आहोत की बाळ आल्यानंतर न्यूझीलंडच्या दक्षिण भागात फिरायला जाऊ, कारण तिथे जाण्याचा आम्ही विचार केला नव्हता. आता ते आमच्या बकेट लिस्टमध्ये आहे. कदाचित आम्ही बाळाबरोबर बंजी जंपिंग करू शकतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.