दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रमुख भूमिका असलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ ही टेलिव्हिजनवर सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका होती. यातील सुशांत आणि अंकिता म्हणजेच मानव आणि अर्चनाच्या जोडीला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. सात वर्षांनंतर पुन्हा एकदा ही मालिका नव्या रूपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यात सुशांतची भूमिका आता शाहीर शेख साकारताना दिसेल. काही दिवसांपूर्वी या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांन समोर आली असून ही मालिका ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अंकिताने नुकताच या मालिकेचा टीझर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अंकिताने शेअर केलेला हा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात अंकिता आणि शाहीरने लग्नाचे कपडे परिधान केले आहेत. या प्रोमोमध्ये पार्श्वभूमीवर एक आवाज येतो आणि प्रेमाची परिभाषा सांगताना दिसत आहे. शेवटी मानव आणि अर्चनाचे लग्न होताना दाखवण्यात आले आहे. हा टीझर शेअर करत अंकिताने कॅप्शन दिलं “जेव्हा अर्चना आणि मानव एकत्र येतील तेव्हा प्रेम तर होणारच, त्यांच्या या प्रवासात सामील व्हा लवकरच पवित्र रिश्ता २.० झी ५ वर #itsnevertoolate.”

शाहीरने देखील हा टीझर शेअर करत कॅप्शन दिलं “दोन सामान्य माणसांच्या कथा जे एकमेकांनासाठी स्पेशल आहेत.” ‘पवित्र रिश्ता’ चा हा टीझर पाहून नेटकाऱ्यांना अक्षरश: वेड लागलं आहे. ते या टीझरच्या प्रेमात पडले असून यावर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, “मला सुशांतची आठवण येत आहे.” तर दुसरा युजर म्हणाला की, “सगळं खूप छान आहे प्रोमो, गाणं त्यातील सीन….तुम्ही यात खूप छान दिसत आहात. माझा शाहीरा मी अजून थांबू नाही शकत.”

anikta-shaheer
Photo-Instagram /Shaheer Sheikh

शाहीर आणि अंकिताच्या या पोस्ट खाली छोट्या पडद्यावरील त्यांच्या मित्रमंडळींनी  देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एकंदरीत हा टीझर पाहून प्रेक्षक आता प्रचंड प्रमाणात उत्सुक झालेले दिसून येत आहेत.