‘मुलगी झाली हो’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी या मालिकेतील होणाऱ्या वादांमुळे तर कधी मालिकेतील सर्वाधीत टीआरपीमुळे. आता ही मालिका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याच कारण म्हणजे मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे अभिनेता अजय पूरकर यांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. अजय पूरकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अजय यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या विषयी माहिती दिली आहे.

अजय पूरकर यांनी त्यांच्या फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत “नमस्कार, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेत आहे. खूप मजा आली काम करताना. अनेक अनुभव आले नव्यानी. सचिन देव सर, उत्तम दिग्दर्शक आणि टीम सांभाळून काम करणारे. सुशांत पोळ, असोसिएट डायरेक्टर उत्तम असलाच पाहिजे हे तू सिद्ध केलंस. विक्रम, सत्या, विनोद, जीतू, महादेव, राकेश, किती जणांची नावे घ्यायची? योगेश, पुन्हा एकदा आपण एकत्र काम केलं आणि खूप धम्माल पण. तसच प्रज्ञा ….एक छान सहकलाकार आणि उत्तम व्यक्ती. रश्मी…. खूप प्रेम…छान कर काम…विशेष आभार लता श्रीधर … शादाब शेख ….संजय कोलवणकर….सर्व कॅमेरा टीम…. नेपाळ गँग…पॅनोरमा प्रॉडक्शन्स खूप खूप धन्यवाद.. रोहिणी निनावे ….खूप खूप धन्यवाद, कायम सगळे लक्षात रहाणार…पुन्हा लवकरच भेटू …नवीन प्रोजेक्ट घेऊन….” असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा : “मी तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडलो आणि तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने दिलं उत्तर

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अजय पूरकर यांनी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड चित्रपटामध्ये बाजीप्रभूंची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांचा ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सध्या ते चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये व्यस्त आहेत. प्रेक्षक पुन्हा त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.