गेल्या काही वर्षात लाईव्ह कार्यक्रमांचं प्रस्थ वाढलेलं दिसत आहे. अनेक ठिकाणी बड्या सेलिब्रिटींना आणून गाणं, नाच असे मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात. या कार्यक्रमांना प्रेक्षकही चांगलीच गर्दी करतात. अशावेळी अनेकदा या प्रेक्षकांना नियंत्रणात ठेवणं कठीण होऊन जातं आणि त्याचा त्रास कलाकारांना होतो. नुकताच जौनपूरमध्ये असा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी प्रेक्षकांनी अभिनेत्रीवर दगडफेकही केल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : अनुपम खेर यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पाहून नेटकरी नाराज; म्हणाले, “‘द काश्मीर फाईल्स’च्या वेळी…”

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह हिने नुकतीच बदलापूर महोत्सवात हजेरी लावली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अक्षरा सादरीकारणासाठी स्टेजवर गेली असता हा गोंधळ झाला. अक्षरा सिंग भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. बदलापूर महोत्सवात अक्षराचा डान्स परफॉर्मन्स रात्री ९:४५ च्या सुमारास सुरु झाला. अक्षरा स्टेजवर तिच्याच गाण्यांवर नृत्य सादर करत होती. पण अचानक उपस्थित प्रेक्षकांची गर्दी नियंत्रणात ठेवणे कठीण झाले आणि लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

अक्षराने प्रेक्षकांना शांत राहण्याची विनंतीही केली पण त्यांनी स्टेजवर दगडफेक सुरू केली. तर काहींनी तिच्यावर कागदाचे बोळेही फेकले. लोकांच्या या कृत्यामुळे संतापलेल्या अक्षरा सिंहने परफॉर्म न करताच स्टेज सोडला.

हेही वाचा : Video: शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफावर खास रोषणाई, हटके अंदाजात दिल्या गेल्या किंग खानला शुभेच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षरा व्यतिरिक्त ‘हर-हर शंभू’ फेम अभिलिप्सा पांडा देखील जौनपूरच्या बदलापूर फेस्टिव्हलमध्ये उपस्थित होती. या दोघींना पाहण्यासाठी हजारो लोक जमले आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ झाला. यावेळी फेकल्या गेलेल्या दगडांमुळे काहींना दुखापत झाल्याचेही समोर आले आहे. प्रेक्षकांच्या या कृत्याचा अक्षराला प्रचंड राग आल्याचे दिसत आहे.