फॅन्सी कारमधून सुंदर मुलींसह उतरणारा जेम्स बॉन्ड आपण आजवर पाहत आलोय. पण तोच जेम्स बॉन्ड जर फॅन्सीकारमधून बाहेर पडताना पान बहार तोंडात टाकून आपली ओळख सांगत असेल तर.. विचारात पडलात ना.. पण असं खरंच झालं आहे. मात्र, जेम्स बॉन्ड त्याच्या चित्रपटात असे करताना दिसणार नाहीये. तर पान बहारच्या नव्या जाहिरातीत बॉन्ड दिसणार आहे. त्यामुळे हा प्रसिद्ध गुप्तहेरही त्याचा दिवाना झालेला आता पाहावयास मिळतेय.
पिअर्स ब्रॉस्नॅन हा जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारा पाचवा अभिनेता आहे. इरिश अभिनेता असलेला पिअर्स आता पान बहारचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाला आहे. जगातील सर्वात महाग असा पान मसाला आता पुन्हा त्यांच्या ‘पेहचान कामयाबी की’ या टॅगलाइनला पुनर्जिवीत करण्याचा प्रयत्न करत आहे. बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याने त्याच्या स्टाइमध्ये पान बहारची जाहिरात देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या एजंट विनोदची भुरळ लोकांवर काही पडली नाही. त्यामुळेच बहुदा या कंपनीने पिअर्स ब्रॉस्नॅनची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केलेली दिसते. या एक मिनिटाच्या जाहिरातीत दाढी वाढलेला आणि सूटबूटमधील पिअर्सचा दिमाखदार लूक पाहावयास मिळतो. त्यानंतर तो पान मसालाचा डबा उडवत आपल्या बॉन्ड स्टाइलमध्ये शत्रूंशी कसे दोन हात करतो ते पाहण्यासाठी तुम्हाला जाहिरात पाहावी लागेल. दरम्यान, ही बातमी कळताच साहजिकच नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. ट्विटरवर, पिअर्सच्या चाहत्यांनी काही मजेशीर ट्विट केले आहेत.

https://twitter.com/Hoorki/status/784257228597362688