दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणून अभिनेता कार्थी याला ओळखले जाते. त्या नेहमी त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जाते. मात्र सध्या तो त्याच्या फेसबुक अकाऊंटमुळे चर्चेत आला आहे. कार्थीचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कार्थीने स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे.

कार्थी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो फेसबुकवर विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. मात्र आज सकाळी कार्थीचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. कार्थीने स्वत: ट्वीट करत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे.
आणखी वाचा : “मी गरोदर राहण्यास सक्षम नाही हे समजताच…” दुसऱ्यांदा आई झालेल्या देबिना बॅनर्जीचा मोठा खुलासा

कार्थीने आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास एक ट्वीट केले. त्यात त्याने त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. “नमस्कार मित्रांनो, माझे फेसबुक पेज हॅक झाले आहे. आम्ही ते पुन्हा रिस्टोअर करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्वीट त्याने केले आहे. कार्थीचे हे ट्वीट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. त्याचे अनेक चाहते त्यावर कमेंट करताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कार्थी हा सध्या त्याच्या ‘पोनियिन सेल्वन’ आणि ‘सरदार’ या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. मणिरत्नम यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘पोनियिन सेल्वन’ ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आतापर्यंत ४८० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि दाक्षिणात्य अभिनेता विक्रम मुख्य भूमिकेत दिसत आहेत.