scorecardresearch

Video : विक्रमची खिल्ली उडवण्याचा डाव कपिल शर्मावरच उलटला, अभिनेत्याने केली बोलती बंद

चियान विक्रमच्या उत्तरावर कपिल शर्मा गप्प झाला.

Video : विक्रमची खिल्ली उडवण्याचा डाव कपिल शर्मावरच उलटला, अभिनेत्याने केली बोलती बंद
कपिलने तमिळ स्टार विक्रमची खिल्ली उडवण्याची पूर्ण योजना आखली होती. मात्र त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये या आठवड्यात खूप धम्माल पाहायला मिळणार आहे. नुकतीच ‘पोन्नियन सेल्वन १’च्या टीमने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजेरी लावली होती. निर्मात्यांनी या एपिसोडचा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित केला आहे. ‘पोन्नियन सेल्वन- १’ स्टार्स विक्रम, त्रिशा कृष्णन, कार्थी आणि जयम रवी यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनही आहे, पण काही कारणास्तव ती या शोमध्ये सहभागी होऊ शकली नाही. यावेळी कपिलने तमिळ स्टार विक्रमची खिल्ली उडवण्याची पूर्ण योजना आखली होती. मात्र त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला.

कपिल शर्माने सर्वांना चित्रपटाच्या शूटिंग आणि कथेशी संबंधित अनेक प्रश्न विचारले आणि त्यानंतर विक्रमकच्या ‘अज्ञात’ चित्रपटाचा उल्लेख करत असा काही प्रश्न विचारला की सगळे हसू लागले. कपिल शर्मा विक्रमला विचारतो, “तुम्ही ‘अप्रिचित’चे शूटिंग करत असताना तुमच्या मनात असे आले होते का की, एक दिवस तुम्हाला कपिल शर्माच्या शोमध्ये येण्याची संधी मिळेल?”

कपिल शर्माच्या या प्रश्नावर उत्तर देताना विक्रम असं काही बोलला की कपिल शर्माची बोलतीच बंद झाली. विक्रम म्हणाला, “हो, मी कधीच विचार केला नव्हता. पण मी आठवीत असताना. ही गोष्ट १९७६ सालची आहे. तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता ना? तेव्हा मी ठरवले होते की मला कपिल शर्मा शोमध्ये जायचं आहे.” विक्रमच्या उत्तरावर कपिल शर्मा गप्प झाला. विक्रमची खिल्ली उडवण्याचा त्यांचा डाव त्याच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला.

आणखी वाचा- “मला अनुभव आहे व्हिस्कीनंतर ट्विटर…” कपिल शर्माचा चियान विक्रमला खास सल्ला

दरम्यान PS-1 हा मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून तयार होत आहे. यामध्ये विक्रम व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चन, कार्थी, जयम रवी आणि त्रिशा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची स्पर्धा हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर ‘विक्रम वेधा’शी होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या