अर्धनग्न फोटोंमुळे आणि विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी मॉडेल पूनम पांडेने एका कन्नड चित्रपटात आयटम साँग करण्यासाठी पाच कोटी रुपये घोतले. ‘नशा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी पूनम आता दक्षिण भारतीय चित्रपटात काम करणार आहे. ‘नशा’ चित्रपटातील पूनमचा अभिनय पाहून भारावून गेलेल्या एका चित्रपट निर्मात्याने त्याच्या आगामी चित्रपटातील आयटम साँगसाठी पूनमकडे विचारणा केली. पूर्ण चित्रपटासाठी जेव्हढे पैसे एका अभिनेत्रीला दिले जात नाहीत, तेव्हढे पैसे आपल्याला या आयटम साँगसाठी दिले गेले असल्याचे पूनम म्हणाली. पूनमने आपल्या चित्रपटात काम करावे यासाठी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अन्य चित्रपटकर्ते देखील तिच्याशी संपर्कात असल्याची चर्चा आहे.
‘नशा’ हा तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर, पूनमने चाहत्यांच्या चर्चेत राहण्यासाठी ट्विटरवर अर्धनग्न फोटो प्रसिध्द करणे आणि धक्कादायक विधाने करणे असे मार्ग अवलंबले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2013 रोजी प्रकाशित
पूनम पांडेला आयटम साँगसाठी मिळाले पाच कोटी
अर्धनग्न फोटोंमुळे आणि विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी मॉडेल पूनम पांडेने एका कन्नड चित्रपटात आयटम साँग करण्यासाठी पाच कोटी रुपये घोतले. 'नशा' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी पूनम आता दक्षिण भारतीय चित्रपटात काम करणार आहे.
First published on: 27-11-2013 at 04:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam pandey bags rs 5 crore for an item song