प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत हिने तिच्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. सुलतानपूर येथील घरात तिचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मल्लिकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या पोलीस तपास करत असून मल्लिका राजपूतने आत्महत्या का केली, यामागच्या कारणांचा शोध घेत आहेत.

मृत मल्लिका राजपूतची आई सुमित्रा सिंह यांनी सांगितलं की अभिनेत्री नेहमीप्रमाणे रात्री खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद केला. सकाळी तिने दरवाजा न उघडल्याने घरातील सदस्यांनी कसा तरी दरवाजा उघडला. त्यावेळी मल्लिका पंख्याला लटकलेली दिसली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. ‘इंडिया टीव्ही’ ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

९ दिवसांनी नदीतून सापडला प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृतदेह, हिमाचल प्रदेशमध्ये झाला होता कार अपघात

दरम्यान, मल्लिका राजपूतने बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतसह काम केलं होतं. ती कंगनाबरोबर ‘रिव्हॉल्वर रानी’ या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसली होती. गायक शानच्या ‘यारा तुझसे’ या म्युझिक अल्बममधून मल्लिकाला नाव आणि प्रसिद्धी मिळाली. याशिवाय मल्लिकाने अनेक मालिका व म्युझिक अल्बममध्ये काम केलं होतं.

अभिनेत्याने शेती करण्यासाठी सोडला अभिनय, मोठं नुकसान झालं अन् आता कर्ज फेडण्यासाठी…; म्हणाला, “पाच वर्षे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मल्लिका राजपूतने राजकारणातही हात आजमावला होता. तिने भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, २०१८ मध्ये तिने पक्ष सोडला. मनोरंजन विश्वात आणि नंतर राजकारणात तिचं करिअर यशस्वी होऊ शकलं नाही, त्यानंतर मल्लिका अध्यात्माकडे वळली होती.