छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही जोडी लवकरच खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा पार पडला. अभिनेत्री अक्षया देवधरने घराघरांमध्ये पाठक बाईच्या नावाने एक वेगळी ओळख निर्माण केली. आज अक्षय देवधरचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक जोशीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हार्दिक जोशी हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त त्याने सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत. यात त्याने तिच्या वाढदिवसानिमित्त खास डेकोरेशन केले आहे. त्यासोबत तिच्यासाठी त्याने दोन केकही आणले आहे. यात ते दोघेही छान रोमँटिक पोजमध्ये फोटो काढताना दिसत आहे. ते दोघेही फार गोड हसताना दिसत आहेत.

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…

या फोटोंना हार्दिकने फार हटके कॅप्शन दिले आहे. ‘माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय आणि मौल्यवान व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’, असे हार्दिक म्हणाला. त्याच्या या पोस्टवर अक्षयानेही ‘आय लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे.

सध्या हार्दिकची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. त्या या पोस्टवर अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी, चालतंय की, अशा कमेंट अनेकजण त्याच्या या पोस्टवर करताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं त्याला ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिले होते. यात तिने दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र करत हॅशटॅग म्हणून वापरला आहे. याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं आहे.