‘आदिपुरुष’ बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर प्रभासचे चाहते त्याच्या आगामी ‘सालार’ची आतुरतेने वाट बघत होते. काहीच दिवसांपूर्वी यांचा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. २२ डिसेंबरला हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘सालार’बद्दल आता एक नवी माहिती समोर आली आहे. रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’प्रमाणेच प्रभासच्या ‘सालार’वरही सेन्सॉरची कात्री चालणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटाला सेन्सॉरकडून ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर चित्रपटाचा रन-टाइमदेखील समोर आला आहे. २ तास ५५ मिनिटे म्हणजेच तब्बल ३ तासांचा हा चित्रपट असणार आहे. चित्रपटात जबरदस्त अॅक्शन सीन्स, रक्तपात अन् हिंसाचार पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : “पूढील चित्रपट ‘अ‍ॅनिमल’पेक्षाही…” संदीप रेड्डी यांचा जुना व्हिडीओ चर्चेत

‘सालार’च्या ट्रेलरमध्ये पृथ्वीराजच्या लुकने, प्रभासच्या अॅक्शनने, बॅकग्राऊंड स्कोअरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याबरोबरच नुकतंच प्रशांत नील यांनी ‘सालार’ आणि ‘केजीएफ’मध्ये कोणताही संबंध नसल्याचंही स्पष्ट केलं आहे, त्यामुळे हा एक स्वतंत्र वेगळाच चित्रपट असणार आहे. काहींनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे तर काहींनी याला ‘केजीएफ’ची कॉपी म्हणून नाकारलं आहे. ‘केजीएफ’प्रमाणेच एक वेगळं विश्व उभं करण्यात प्रशांत नील हे यशस्वी झाल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच चित्रपटाला मिळालेलं ‘ए’ सर्टिफिकेट आणि चित्रपटाची लांबी पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचणार हे निश्चित आहे. होम्बल फिल्म्स निर्मित, ‘सालार: पार्ट १ सीझफायर’ हा चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू हे मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून याच चित्रपटाबरोबर शाहरुख खानचा बहुचर्चित ‘डंकी’देखील एक दिवस आधी म्हणजेच २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.