अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपला दिनक्रम, चित्रपट, कुटुंबाबाबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. चाहत्यांनी संवाद साधण्याचा हा तिचा अनोखा फंडा आहे. प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. यामधल्या काळामध्ये प्राजक्ताने आपल्या कुटुंबियांबरोबर एकत्रित वेळ घालवला. आता देखील तिने कुटुंबाबरोबर श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाचं दर्शन घेतलं आहे.

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे आमिर खान निराश, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

प्राजक्ता सोमवारी (१५ ऑगस्ट) सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे गेली होती. श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाचं दर्शन घेण्यासाठी ती तिथवर पोहोचली. दरवर्षी प्राजक्ताचे कुटुंबिय श्रावणामध्ये या मंदिरात येतात. महादेवाचं दर्शन घेतात. ही आमच्या घराची परंपरा आहे असं प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महादेवाचं दर्शन करतानाचा एक व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलं की, “योगी- महादेव. श्रावण महिन्यात शिखर शिंगणापूर – महादेवाचं दर्शन. ही घराची परंपरा. काल सोमवारचा मुहूर्त गाठून साळकाय – म्हाळकायसह (आई- मावशी किंवा याज्ञा- शिवा काहीही घ्या) दर्शन घेतलं.” प्राजक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – Video : “माझे स्तन तापसीपेक्षा…” अनुराग कश्यपचं ‘ते’ विधान चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ताची देवावर खूप श्रद्धा असल्याचं या व्हिडीओमधून दिसून येतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व आता प्रसारित झालं आहे. म्हणजेच प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाचा डबल डोस आणि प्राजक्ताचं उत्तम सुत्रसंचालन अनुभवायला मिळणार आहे.