scorecardresearch

Loksatta Exclusive : “…तर मग ती डीलीट नाही करायची”, प्राजक्ता माळीच्या राजकीय भूमिकेवर प्रसाद ओकने मांडलं परखड मत

प्रसाद ओकने नुकतीच ‘लोकसत्ता डॉटकॉम’ला मुलाखत दिली होती त्यावेळी त्याने त्याच मत मांडलं आहे.

prajakta mali political post, prasad oak,
प्रसाद ओकने नुकतीच 'लोकसत्ता डॉटकॉम'ला मुलाखत दिली होती त्यावेळी त्याने त्याच मत मांडलं आहे.

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओकने नुकतीच ‘लोकसत्ता डॉट कॉमला मुलाखत दिली होती. यावेळी कलाकार राजकीय भूमिका घेतात त्यावर प्रसादने त्याचं मत मांडलं आहे.

प्रसादने नुकतीच ‘लोकसत्ता डॉट कॉमला’ मुलाखत दिली. यामुलाखतीत “कलाकार राजकीय भूमिका घेतल्यामुळे ट्रोल होतात आणि त्यामुळे त्यांना कुठे तरी आपण आपलं मत मांडू शकत नाही असे वाटते का?” यावेळी प्राजक्ता माळीच्या राजकीय पोस्टविषयी विचारले असता प्रसाद ओकने त्याचे मत मांडले आहे. “एकतर मी प्राजक्ताची पोस्ट पाहिली नाहीये. पण मला असं वाटतं की ट्रोलर्स दुसरे काही धंदे नसतात. कलाकारांनी त्यांना फाट्यावर मारूनच जगल पाहिजे. कलाकार हे प्रेक्षकांसाठी आहेत की ट्रोलर्ससाठी, प्रेक्षकांसाठी आहे आणि त्यांच्यासाठीच त्यांनी जगल पाहिजे. मुळात ते ट्रोल करतील अशी स्टेटमेंट करायची कशाला आणि जर करायची आहेत तर मग ती डीलीट नाही करायची, असं माझं मत आहे,” असे प्रसाद म्हणाला.

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

आणखी वाचा : Sohail Khan-Seema Khan Divorce: लग्नाच्या २४ वर्षांनंतर सोहेल खान आणि सीमा खान घेणार घटस्फोट?

१३ मे अर्थात आज सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा खास शो आज सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prajakta mali political post prasad oak says if you post it on social media then do not delete it dcp

ताज्या बातम्या