विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच अमृताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने चंद्रमुखी चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याची माहिती दिली आहे. त्यासोबत तिने चंद्रमुखी चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे.

‘चंद्रमुखी’साठी आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकरची निवड का केली? प्रसाद ओकने सांगितले कारण

चंद्रमुखी…अडीच वर्षांचा प्रवास…. खडतर पण सुखावणारा, आतापर्यंत तुम्ही गाण्यांना डोक्यावर उचलून घेतलत. आता येतोय ट्रेलर….आहात कि नाही उत्सुक ? ‘चंद्रमुखी ट्रेलर…येत आहे आज…!!! असे अमृता हे पोस्टर शेअर करताना म्हणाली. त्यासोबत तिने आज २० एप्रिलला चंद्रमुखी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत असल्याची माहितीही प्रेक्षकांना दिली.

तर दिग्दर्शक प्रसाद ओकनेही याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. दृष्ट लागावी अशी ‘चंद्रा – दौलत’ ची प्रेमकहाणी, घेणार नवं वळण…’चंद्रमुखी’ TRAILER…येत आहे आज…!!!, असे प्रसाद ओकने म्हटले आहे.

“…अन् मी तुझ्यावर फिदा झाले”, अमृता खानविलकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे