मराठीमध्ये एकापेक्षा एक उत्तम चित्रपट देणारा अभिनेता प्रसाद ओक सध्या एक उत्तम दिग्दर्शक म्हणूनही नावारुपास येत आहे. अलिकडच्या काळात त्याचं दिग्दर्शन असेलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बराच मोठा गल्ला जमवल्याचं पाहायला मिळालं. काही वर्षांपूर्वी प्रसाद ओकनं ‘दिया और बाती’ मालिकेत एक छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र त्यानंतर तो फारसा हिंदी अभिनय क्षेत्रात दिसला नाही. नुकत्याच एका मुलाखतीत जेव्हा त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं या प्रश्नावर परखड मत व्यक्त केलं.

हिंदी चित्रपट किंवा टीव्ही सृष्टीत मराठी कलाकारांना मिळणाऱ्या भूमिका आणि मानधन हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरताना दिसतो. हिंदी अभिनयसृष्टीत काम करण्याच्या मुद्द्यावर बोलताना प्रसाद ओक म्हणाला, ‘सध्या मी मराठी अभिनय क्षेत्रात काम करत आहे आणि मी या ठिकाणी खूप आनंदी आहे. हिंदी अभिनय क्षेत्रात काम करण्याची माझी सध्या तरी अजिबात इच्छा नाही. जेव्हा मराठी कलाकारांनी हिंदी अभिनय क्षेत्रात कामाची संधी मिळते तेव्हा त्यांच्या आर्थिक फायद्याचा फार कमी विचार केला जातो. त्यांच्यासोबतच्या हिंदी भाषिक कलाकारांना तुलनेत जास्त मानधन मिळतं.’

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?

आणखी वाचा- “सासरी करीनासोबत बसून जेवण करणंही कठीण…” कुणाल खेमूनं सांगितला अनुभव

प्रसाद ओक पुढे म्हणाला, ‘जर मला मराठी अभिनय क्षेत्रात हिंदी अभिनय क्षेत्रापेक्षा जास्त मानधन मिळत असेल तर मग मी हिंदी भाषेत काम का करावं? त्यापेक्षा मी माझ्याच भाषेत काम करेन. खरं तर मला हिंदीमधून फारशा ऑफर आल्या नाहीत. त्यामुळे मी त्याचा कधी फारसा विचारही केला नाही. मी माझ्या भाषेत काम करून खुश आहे. मला माझ्या प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. त्यामुळे हिंदी मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा मी मराठीमध्ये एखादी छोटी भूमिका साकारेन.’

आणखी वाचा- सोनाली कुलकर्णीलाही ‘चंद्रमुखी’ची भुरळ, जबरदस्त लावणीचा व्हिडीओ एकदा पाहाच

दरम्यान सध्या प्रसाद ओक त्याचा आगामी चित्रपट ‘चंद्रमुखी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक करत आहे. तर चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.