मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणून अभिनेता प्रसाद ओकला ओळखले जाते. अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवणारा प्रसाद ओक सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते. नुकतंच प्रसाद ओक याने पत्नी मंजिरीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याने खास पोस्ट शेअर करत तिला एक खास गिफ्टही दिली आहे.
प्रसाद ओक आणि मंजिरी हे दोघेही ७ जानेवारी १९९८ रोजी विवाहबंधनात अडकले. या दोघांनी लव्ह मॅरेज केले आहे. त्या दोघांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने त्याने मंजिरीला एक अनोखे गिफ्ट दिले आहे. याबद्दल त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने तीन पोस्ट शेअर केल्या आहेत.
“आज आमचं लग्न 25 व्या वर्षात पदार्पण करतंय. एवढ्या मोट्ठ्या काळात आयुष्याचे अनेक चढउतार पाहिले. अनेक सुख दुःखाचे क्षण अनुभवले. अनेक माणसं, अनेक नाती जोडली… तुटली सुद्धा… या सगळ्यात अविरत राहिली, ती फक्त तुझी सोबत…तुझी साथ…आणि तुझं प्रेम…!!! माझे शब्द संपले म्हणून एवढंच म्हणतो. ना अजून झालो मोठ्ठा, ना स्वतंत्र अजुनी झालो, तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो …”, असे प्रसाद ओक म्हणाला.
“गेली 24 वर्षं एकमेकांना अनेक GIFTS दिल्यानंतर… या वर्षी काय GIFT द्यायचं ??? दोघांनाही सुचत नव्हतं… मग अचानक काही माणसं भेटली… काही छान घडलं आणि मग ठरलं काय GIFT द्यायचं एकमेकांना. हेच ते GIFT… “प्रेमाची भेट””, असे प्रसाद ओक म्हणाला.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अडकणार लग्न बंधनात? अभिनेत्री म्हणाली “येणारे वर्ष…”
यानंतर प्रसाद ओकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ५ मिनिटे १५ सेकंदाचा आहे. यात त्या दोघांनीही छान रोमँटिक व्हिडीओ शूट केला आहे. हेच ते GIFT. आतापर्यंत प्री वेडींगचे बरेच व्हिडीओ आपण पाहिले. पण पोस्ट वेडींगचा हा आमच्या माहितीनुसारचा पहिला व्हिडीओ, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मंजू, असे प्रसाद ओक म्हणाला. सध्या प्रसाद ओकची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. तसेच त्याची ही पोस्ट फार चर्चेत आहे.