अभिनेते प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. प्रशांत यांची विनोदीबुद्धी प्रेक्षकांची मने जिंकते. मराठी नाटक आणि खवय्यांसाठीचे खास कार्यक्रम हे ते नेहमीच रंगवतात. प्रशांत हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच प्रशांत यांनी एक पोस्ट शेअर केली. मात्र, या पोस्टवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने प्रशांत यांचे लक्ष वेधले आहे. या नेटकऱ्याने “टुकार मालिका कशा बंद होतील?” असा सवाल प्रशांत यांना केला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रशांत यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी भावी रंगकर्मींच्या कार्यशाळेबाबत सांगितले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “संपूर्ण महाराष्ट्रातून जवळ जवळ ४८६ जणांनी इच्छा दाखवली होती. त्यातून ३१ जणांना निवडून आता त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यावर तीन महिने काम करणार आहोत. पुणे, चिंचवड, मुंबई, अंबेजोगाई , नागपूर, नाशिक, तुळजापूर, गढचिरोली, उस्मानाबाद इथून हे भावी रंगकर्मी आले आहेत,” असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : KBC 13 : १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

आणखी वाचा : आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या क्रूझवरील पार्टीचा व्हिडीओ आला समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, “टुकार मराठी मालिका कशा बंद होतील? ते सांगा.” नेटकऱ्याच्या या कमेंटने प्रशांत यांचे लक्ष वेधले आणि ते मजेशीर उत्तर देत म्हणाले, “बघण बंद केलं की,” ही कमेंट करत प्रशांत यांनी हसण्याचे इमोजी देखील वापरले आहे. प्रशांच यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.