‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणा-या प्रशांत नाकतीच्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात.

सध्या महाराष्ट्रात निवडणूकांचे वारे वाहत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर ‘नादखुळा म्युझिक’ रेकॉर्ड लेबल प्रस्तुत, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मीत ‘आपलीच हवा’ गाणं नुकतचं प्रदर्शित झालं. या गाण्यात ग्रामीण भागातील निवडणूकीचं हुबेहूब दर्शन घडवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘आपलीच हवा’ या गाण्याचा गीतकार आणि संगीतकार प्रशांत नाकती आहे. तर गायक आदर्श शिंदे आणि गायिका सोनाली सोनावणेने हे गाणं गायलं आहे. या गाण्यात संजना पंडीत, विशाल फाले, निक शिंदे, रितेश कांबळे, सचिन कांबळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र ‘आपलीच हवा’ गाण्याची चर्चा रंगली आहे.

Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच

आणखी वाचा : “जात…जात नाही तोवर…”, केदार शिंदे यांनी ‘झुंड’ चित्रपटावरुन केलेले ट्वीट चर्चेत

त्याच्या या गाण्याविषयी बोलताना प्रशांत नाकती म्हणाला, “सध्या महाराष्ट्रात निवडणूकांचा माहोल आहे. या निवडणूकांमध्ये तरूण वर्ग फक्त प्रचार करताना दिसतो. पण जेव्हा उमेदवार पदाची वेळ येते, तिथे कोणतीच तरूण मंडळी दिसत नाही. आपल्या भारतात निम्याहून अधिक युवा आहेत. मग आपला तरूण वर्ग उमेदवारीसाठी पुढे का येत नाही? त्यांच्यात क्षमता आहे तर ते राजकारणात का उतरत नाही? हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तरूण नेते या देशात आहेत. ‘आपलीच हवा’ हे गाणं लिहीताना माझ्या डोक्यात हे सर्व विषय सुरु होते आणि मी ते गाण्यामार्फत मांडले आहेत.”

आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव

पुढे तो म्हणाला, “महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणारे आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. त्यांची साथ गायिका सोनाली सोनावणेने दिली आहे. याआधी आदर्श दादाने गायलेली ‘मी नादखुळा’आणि ‘आपली यारी’ ही दोन गाणी सुपरहीट झाली. तसंच दादासोबतचं हे तिसरं गाणं आहे. त्यामुळे मी फार उत्सुक आहे.”

आणखी वाचा : …अन् शाहरुख खानने ड्रायव्हरला मारली मिठी, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

गाण्याच्या चित्रीकरणाविषयी प्रशांत सांगतो, “गाण्याचं चित्रीकरण हे नाशिकमधील मोहाडी या गावात झालं आहे. तर गाण्यातील काही दृश्यं आम्ही जानोरी गावात शुट केली आहेत. जिथे आम्ही आधी ‘माझी बायगो’ या गाण्याचं शूटिंग केलं होतं. रोहीत जाधव आणि त्याच्या टीमने सर्व व्यवस्था केली होती. नाशिकमध्ये शूट करताना खूप मज्जा आली. काही कलाकार आम्ही गावातलेच घेतले. त्यामुळे या गाण्याला गावरान लुक मिळाला आहे. दोन दिवसाच्या शूटींगला तीन दिवस लागले. परंतु शूट करतानाचा अनुभव खूप भारी होता.”