छोट्या पडद्यावरील जीव माझा गुंतला मालिकेचे काही प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये बरीच उत्सुकता आहे. मालिकेची पट कथा काय असेल, कोण कोण कलाकार मालिकेत असतील? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना समोर आहेत. या मालिकेतून आपल्या सगळ्यांची प्रतिक्षा आपल्याला पुन्हा एकदा भेटायला येणार आहे.

घाडगे & सून या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये अबाधित स्थान मिळवले. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहेत. यामध्ये अजून एका नावाची कमतरता आहे आणि ते म्हणजे कियारा. कियाराची भूमिका साकारणारी प्रतिक्षा मुणगेकर तीन वर्षानंतर पुन्हाएकदा कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या नव्या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
bjp manifesto titled modi ki guarantee
समोरच्या बाकावरून : खोटी खोटी गॅरंटी..
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

आणखी वाचा : इंडियन आयडल १२ : ‘या’ दोन गायकांना हिमेश रेशमीयाने दिली म्युझिक अल्बममध्ये संधी

 

View this post on Instagram

 

A post shared by (@pratikshamungekarofficial)

प्रतिक्षा मालिकेत चित्रा खानविलकरच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “खरं सांगायचं तर मला घरी परतल्यासारखं वाटतं आहे. तब्बल तीन वर्षानंतर मी पुन्हा कलर्स मराठीवर मालिका करते आहे आणि टेल-अ-टेल मिडीयाचं प्रॉडक्शन हाऊस आहे, हा एक योगायोग म्हणावा लागेल. वाहिनी आणि प्रॉडक्शन हाऊसने इतका विश्वास दाखवला आहे त्यामुळे माझी जबाबदारी खूप वाढली आहे असं मला वाटतं. खूप मजा येते आहे सेटवर, तीच लोकं आहेत आजूबाजूला, खुप सकारात्मक वातावरण आहे. त्याच जोमाने काम करणारे आहेत. ज्याप्रकारे कियारावर प्रेम केलं तसेच चित्रावर देखील करा हीच ईच्छा आहे.”

आणखी वाचा : टायगर आणि दिशाच्या रिलेशनशीपवर जॅकी श्रॉफ यांचे वक्तव्य, म्हणाले…

दोन विरुद्ध विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्या तर? अंतरा आणि मल्हारच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. मल्हार – अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे. तेव्हा नक्की बघा ‘जीव माझा गुंतला’ २१ जूनपासून सोम ते शनि रात्री ९.३०वा. आपल्या कलर्स मराठीवर.