बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे प्रीति झिंटा. बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ म्हणून तिला ओळखले जाते. प्रीति झिंटा हिने आपल्या दमदार अभिनयाने आणि परफॉर्मन्सने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या प्रीति ही मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. गेल्या महिन्यात प्रीतिने सरोगसीद्वारे दोन मुलांची आई झाल्याची माहिती दिली होती. यानंतर आता तिने त्या दोन बाळांपैकी एका बाळाची झलक दाखवली आहे.

नुकतंच प्रीतिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती तिच्या बाळाला घेऊन बसल्याचे दिसत आहे. यात बाळाचा चेहरा दिसत नाही. मात्र प्रीतिने त्याला निळ्या रंगाचे टोपी आणि त्याच रंगाच्या चादरीमध्ये गुंडाळल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे आई झाल्याचा आनंद काय असतो हे प्रीतिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

प्रीतिने हा फोटो शेअर करत त्याला अनोखे कॅप्शन दिले आहे. “बर्प क्लोथ्स, डायपर्स अँड बेबीज, मला हे सर्व आवडतंय,” असे तिने यात म्हटले आहे. प्रीतिने शेअर केलेल्या या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत. तसेच या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंटस केल्याचे पाहायला मिळत आहेत. ‘फार छान’, ‘सुंदर’, ‘अभिनंदन’ अशा अनेक कमेंट प्रीतिच्या या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत सारा अली खान झाली भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रीति झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केले. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजलसमध्ये अगदी खाजगी सोहळा करत तिने हे लग्न केलं. प्रीति आणि जीनने अतिशय गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या वेडिंगचे फोटो जवळपास सहा महिन्यांनी मीडिया समोर आले होते. आता लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर प्रीति आई झाली. तिला सरोगसीद्वारे जुळ्याची मुले झाली आहेत. त्या दोघांची नावे जय आणि जिया अशी आहेत.