बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. कधी अभिनयामुळे तर कधी बोल्ड फोटोमुळे तिची सर्वत्र चर्चा सुरु असते. नुकतंच साराने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली होती. हा चित्रपट तीन वर्षांपूर्वी ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांत आणि साराची जोडी प्रेक्षकांना फार आवडली होती. आज या चित्रपटाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साराने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

साराने शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तिने सुशांतच्या आठवणी ताज्या केल्या आहे. विशेष म्हणजे ती तिच्या कारकिर्दीतील सुशांतचे योगदान अद्यापही विसरलेली नाही. सारा इन्स्टाग्रामवर केदारनाथ चित्रपटातील एक छोटीशी व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. ही व्हिडीओ क्लिप शेअर करत तिने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

सारा म्हणाली, “३ वर्षांपूर्वी माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले. मी एक अभिनेत्री झाले आणि माझा पहिला आणि सर्वात खास चित्रपट प्रदर्शित झाला. केदारनाथ हा चित्रपट माझ्यासाठी काय आहे, हे मी कधीही शब्दात मांडू शकत नाही. पण ते ठिकाणी, तो चित्रपट, त्या आठवणी मी कधीही विसरु शकणार नाही.”

“पण असं असले तरी मला माझ्या मन्सूर (सुशांत सिंह राजपूत)ची खूप आठवण येत आहे. सुशांतचा पाठिंबा, त्याची निस्वार्थी मदत, सततचे मार्गदर्शन आणि सल्ला यामुळेच मुक्कू (साराची भूमिका) तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू शकली. सुशांत तुझी नेहमी आठवण येईल,” असे सारा म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारा अली खान लवकरच ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकणार आहे. येत्या २४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे.