विदर्भातील लोकांना लवकर छोट्या पडद्यावर आणि चित्रपटसृष्टीत काम मिळतं नाही असे म्हटले जाते. अशा सगळ्यांगोष्टींना आता अभिनेत्री प्रीती नारनवरेने खोटं ठरवलं आहे. प्रीतीने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली आहे. प्रीतीने तर बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारसोबत काम केले आहे. याविषयी प्रीतीने एका मुलाखतीत सांगितले आहे.
प्रीतीने ‘सकाळ’ला मुलाखत दिली, त्यावेळी तिने तिचा संपूर्ण प्रवासा विषयी सांगितले आहे. प्रीतीने अक्षय कुमारच्या ‘फिलहाल’ या अल्बममध्ये काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना प्रीतीला मॉडेलिंगमध्ये आवड निर्माण झाली. त्यानंतर तिने कॉस्मॅटिकमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यासाठी ती नागपूरला गेली. त्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. यानंतर तिचा खरा मॉडेलिंगचा प्रवास सुरु झाला. आता पुढे जर मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे असेल तर मुंबईला जावे लागेल याची तिला कल्पना होती.
आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं भाष्य म्हणाली…
खरतंर प्रीतीचे भाऊ आणि बहिण दोघेही डॉक्टर आहेत. त्यामुळे तिच्या कुटुंबाला तिच्याकडून ही अनेक अपेक्षा होत्या. तिने शिकूण मोठे व्हावे असे तिच्या कुटुंबाला वाटत होते. हे पाहता प्रीतीने तिच्या कुटुंबाकडे तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी मागितली. त्यांनी होकार दिल्यानंतर या संधीचा पूर्ण फायदा प्रीतीने घेतला. त्यानंतर प्रीतीने कधी पाठी वळून पाहिले नाही. तिला एका मागोमाग एक काम मिळवत आज तीने दहा नाटक, सात मराठी चित्रपट आणि तब्बल १४ मालिका व वेब सीरिजमध्ये काम केले. या पाच वर्षात अक्षय कुमार, विक्की कौशल, मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर, आदित्य रावल अशा अनेक कलाकारांसोबत प्रीतीने काम केले आहे.