सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिच्या बाळाची. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले आहेत. अर्थात प्रियांकानं सरोगसीच्या माध्यमातून मुलीचा जन्म झालाय की मुलाचा हे सांगितलेलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका आणि निकच्या बाळ सध्या रुग्णालयात असून आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे.

‘डेली मेल’नं यासंबंधी वृत्त प्रसारित केलं आहे. प्रियांका चोप्राशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ २७ व्या आठवड्यात जन्माला आलं आहे. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत. त्या महिलेची ही पाचवी सरोगसी आहे. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेण्यात येणार आहे.

प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. तिनं लिहिलं, ‘आम्ही सरोगसीच्याद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.’ आपल्या या पोस्टमध्ये तिनं निक जोनसला टॅग केलं आहे. पण या पोस्टमध्ये तिनं मुलगा की मुलगी हे स्पष्ट केलेलं नाही.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रियांकाच्या सोशल मीडिया पोस्ट बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रेटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. केविन जोनस, जो जोनस, सोफी टर्नर, लारा दत्ता, शेफाली शाह, भूमि पेडणेकर यांच्यासह इतर अनेक कलाकारांनी प्रियांकाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केल्या आहेत. प्रियांका आणि निकचं हे पहिलंच अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झालेला होता.