एकता कपूर टीव्ही विश्वातील एक मोठं नाव. आजवर एकताने एकपेक्षा एक मालिकांची निर्मिती केली आहे. २००० चा दशकांपासून तिच्या निर्मिती संस्थेतील मालिका यशस्वी ठरल्या आहेत. बालाजी टेलिफिल्म्स असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. एकता कपूरने केवळ मालिका विश्वात आपले प्रस्थान निर्माण केले नाही तर बॉलीवूडमध्ये देखील क्या कुल हैं हम, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एकता निर्माती म्हणून जितकी यशस्वी आहे तितकीच ती धार्मिकदेखील आहे . नुकतेच तिने उज्जैन येथील महाकाल, मंगलनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे तसेच पूजादेखील केली आहे.

एकता कपूर, अभिनेत्री रिद्धिमा डोगरा या दोघींनी मंगलनाथ मंदिरात विशेष पूजा केल्यानंतर कालभैरव मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. एकता कपूर कायमच उज्जैनला पूजा करण्यासाठी जात असल्याचं एका सूत्राने सांगितले आहे. एकता मुंबईमध्येदेखील धार्मिक स्थळांना भेट देत असते. एकताच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतंच अभिनेत्री कंगना रणौतने १९ सप्टेंबर रोजी वृंदावन येथील ठाकूर बांके बिहारी मंदिराला भेट दिली, जिथे तिने कुटुंबासह प्रार्थना केली. ती सध्या तिच्या इमर्जन्सी’ या चित्रपटात व्यस्त आहे. चित्रपट चालावा यासाठी तिने प्रार्थना केली आहे. सध्या एकाच चित्रपटाची हवा आहे तो चित्रपट म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’, याच चित्रपटातील रणबीर कपूर, आलिया भट दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनीदेखील उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते मात्र त्यांना गाभाऱ्यात जाता आले नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारावर काही संघटनांनी त्यांना विरोध केला होता.