दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात तिनं अल्लू अर्जुनची गर्लफ्रेंड श्रीवल्लीची भूमिका साकारली होती आणि तिच्यावर चित्रित झालेलं ‘तेरी झलक अशर्फी… श्रीवल्ली’ खूप लोकप्रिय झालं होतं. आज ६ महिन्यांनंतरही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचं वेड पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. पण सध्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल सोशल मीडियावर भलतीच चर्चा आहे. या भागात श्रीवल्लीचा मृत्यू होणार असं बोललं जात आहे. ज्यावर आता निर्मात्यांनी मौन सोडलं आहे.

‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटानंतर याचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण दुसऱ्या भागात श्रीवल्लीचा मृत्यू होणार अशा चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. आता यावर निर्माता वाय रवी शंकर यांनी एका मुलाखतीत मौन सोडत दुसऱ्या भागात असं काहीच होणार नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “या सर्व गोष्टी फक्त अफवा आहेत. अजून आम्ही दुसऱ्या भागाची कथा व्यवस्थित ऐकलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या भागात असं काही होणार नाही. हे सर्व फक्त अंदाज आहेत. जर चित्रपटाबद्दल आपल्याला काहीच माहीत नाहीये तर मग अशाप्रकारे काहीही बोलणं चुकीचं आहे.”

आणखी वाचा- Video : कार्तिक- करण यांच्यात पुन्हा ‘दोस्ताना’, मतभेद विसरून केली धम्माल मस्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अल्लू अर्जुन देखील चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी खूप उत्सुक आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन चंदना तस्कराच्या भूमिकेत आहे. पहिल्या भागाच्या अखेरीस त्याचं आणि श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानाचं लग्न झालेलं दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यात तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. मात्र अद्याप ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाची तारीख ठरलेली नाही.