बॉलिवूड अभिनेता आर माधवन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आर माधवनने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या या पहिल्या चित्रपटानेच प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. पण नुकतंच आर. माधवनने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो लवकरच त्याच्या पत्नी आणि मुलासह दुबईत शिफ्ट होणार असल्याचे बोललं जात आहे.

बॉलिवूड हंगामा या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरु येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या जलतरण स्पर्धेमध्ये आर माधवनचा मुलगा वेदांतने महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली होती. त्यानंतर आता तो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करत आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आर माधवनही त्याला पूर्ण पाठिंबा देताना दिसत आहे.

आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन येत्या २०२६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. पण, भारतात मोठ्या तलावांची कमतरता आहे. तर दुसरीकडे जे तलाव आहेत ते करोनामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे वेदांतच्या सरावात अडथळा निर्माण होत आहे. सध्या भारतातील तलाव बंद असले तरी दुबईमध्ये अनेक मोठे तलाव आहेत. त्यामुळेच वेदांताच्या सरावासाठी आर माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांनी दुबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.

…त्यावेळी मी प्रत्येक दिग्दर्शकला जाऊन भेटलो”; ‘तो’ प्रसंग आठवताना अभिषेक बच्चन भावूक, बिग बी म्हणतात….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेदांत माधवन उत्तम जलतरणपटू आहे. वेदांतला जलतरणात ७ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. वेदांतने ४७ व्या ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये ७ पदके जिंकली. ही स्पर्धा बंगळुरु येथे पार पडली. वेदांतने या स्पर्धेत चार रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली. यात ८०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, १५०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, ४×१०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग आणि ४×२०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग रीले या प्रकारात कांस्य पदक मिळवले होते. तर १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये त्याला रौप्य पदक मिळालं होते.