बॉलिवूड स्टार्स आणि त्यांची मुलं देखील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. जवळपास सगळेच स्टार किड्स आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात. पण अभिनेता आर माधवनच्याबाबतीत मात्र असं अजिबात घडलेलं नाही. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट देणाऱ्या आर माधवनचा मुलगा वेदांतनं मात्र अभिनय नाही तर स्विमिंगमध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवलं आहे. या क्षेत्रात तो आपल्या वडिलांचं आणि सोबतच देशाचं नाव देखील उज्ज्वल करताना दिसत आहे. नुकताच वेदांतनं स्विमिंगमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

आर माधवनचा मुलगा वेदांतनं १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारातील लहान गटाचा राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. या प्रकारात त्यानं सुवर्णपदक जिंकलं आहे. अशा भरीव कामगिरी करत वेदांतनं त्याच्या आई-वडिलांसह देशाच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला आहे. सोशल मीडियावरून आर माधवनच्या मुलाचं खूप कौतुक होताना दिसत आहे. अनेकांनी वेदांत माधवनच्या या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- “… म्हणून मी त्याचा आभारी आहे”; आर माधवनचं सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं कौतुक

आर माधवननं त्याच्या अधिकृ ट्विटर हँडलवरून मुलगा वेदांतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यानं लिहिलं, “कधीच नाही म्हणू नका. फ्रिस्टाइल नॅशनल ज्युनिअर रेकॉर्ड तोडलं.” या ट्वीटमध्ये त्याने वेदांतलाही टॅग केलं. या व्हिडीओमध्ये वेदांत वेगाने पोहताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण वेदांतचं कौतुक करताना दिसत आहेत. या उल्लेखनीय कामगिरीसाठी युजर्सनी वेदांतचं अभिनंदन केलं आहे.

अर्थात अशाप्रकारे सुवर्णपदक मिळवण्याची आर माधवनच्या मुलाची ही पहिली वेळ नाही. या आधीही त्याने स्विमिंगमध्ये वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अगदी अलिकडेच एक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यानं सुवर्णपदक जिंकलं होतं.

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अभिनेता आर माधवनच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याचा ‘रॉकेट्री’ चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात आर माधवननं वैज्ञानिक नांबी नारायण यांची भूमिका साकारली होती.