मराठमोळी अभिनेत्री ऱाधिका आपटेला बॉलिवूडमध्ये बऱ्याच वर्षांपासून काम करत आहे. ती तिच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. अलीकडेच एका मुलाखतीत राधिकाने बॉलिवूडमधील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तसेच तिला एक चित्रपट का गमवावा लागला होता, याचाही खुलासा तिने केला आहे.

तब्बू आडनाव का लावत नाही? खुलासा करत म्हणालेली, “मला वडिलांच्या..”

“मी एक चित्रपट गमावला, कारण माझे वजन तीन किंवा चार किलोने जास्त होते. अर्थात, जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा ते म्हणतात, ‘तुमचं नाक चांगलं नाही, तुझे स्तन मोठे नाहीत’ हे सुरुवातीला खूप व्हायचं. मधेच काही लोक तुमच्या शरीरावर अधिकार असल्यासारखे कमेंट करायचे. आता गेल्या काही वर्षात जागरूकता आल्याने आपण याबद्दल अगदी मोकळेपणाने बोलू शकतो”, ती म्हणाली.

आधी नीतू कपूरनी रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सना लगावला टोला; आता कतरिनाच्या आईने दिलं उत्तर? पोस्ट चर्चेत

विचित्र कारणं देत बऱ्याच चित्रपटांसाठी राधिकाला नाकारण्यात आलं होतं, याबाबत तिने स्वतः सांगितलं आहे. एका मुलाखतीमध्ये राधिकाने सांगितलं की, “काही दिवसांपूर्वीच मला एका चित्रपटासाठी नाकारण्यात आलं. याचं कारण देखील फार विचित्र होतं. माझ्या तुलनेमध्ये दुसऱ्या अभिनेत्रीचे ओठ आणि शरीराची ठेवण अधिक चांगली होती. दुसरी अभिनेत्री तुझ्यापेक्षा अधिक आकर्षक दिसेल आणि ती खूप चालेल असं मला सांगण्यात आलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लोकांचे समज फार विचित्र आहेत. बदलापूर चित्रपट येईपर्यंत लोकांना वाटायचे की मी फक्त खेड्यातील मुलीचीच भूमिका चांगली करू शकते. बदलापूरनंतर लोकांना वाटले की मी फक्त सेक्स कॉमेडी करू शकतो, मी स्ट्रीप करू शकते. म्हणून, मी थांबले, मी त्यांना कधीच त्या भूमिकांना हो म्हटलं नाही,” असं राधिका पुढे म्हणाली.