‘बिग बॉस’ १४चा रनरअप ठरलेला गायक राहुल वैद्यचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राहुलने बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानवर वक्तव्य केलं आहे. आर्यनचे क्लबमधले रुप पाहून राहुल आश्चर्य चकित झाला असं त्याने सांगितलं आहे.
हा व्हिडीओ शाहरूखच्या फॅनपेजने त्यांच्या इन्स्टाअकाऊंटवर शेअर केला आहे. मुंबईतील एका क्लबमध्ये राहुल गेला होता. तेव्हा रात्री १.३०-२ च्या सुमारास आर्यन त्याक्लबमध्ये त्याच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथे पोहोचला होता. मात्र, बाऊंसर आर्यनला क्लबमध्ये येण्याची परवानगी देत नव्हता. तरी सुद्धा आर्यन त्या बाऊंसरशी नम्रतेने वागत होता. आर्यनने एकदा सुद्धा सांगितले नाही की तो बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आहे.
त्यानंतर राहुलने त्या व्हिडीओमध्ये पुढे म्हणाला, “आर्यन सारख्या मुलाला चांगले संस्कार दिल्याबद्दल आणि वाढवल्याबद्दल कौतुक केले पाहिजे.”
दरम्यान, राहुल वैद्य बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या कुटूंबासोबत आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री दिशा परमार सोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईच्या बाहेर गेला आहे.