बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. राहुल आणि दिशाच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर राहुलच्या घरी पूजा केली होती. दिशा आणि राहुलचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हा फोटो राहुल आणि दिशाच्या लग्नानंतर करण्यात आलेल्या श्री सत्यनारायणाची पूजा करतानाचा आहे. या फोटोत दिशा  मराठमोळ्या अंदाजात दिसून येत आहे.  दिशाने गुलाबी रंगाची साडी नेसली असून, त्याला साजेल असा शृंगार देखील केला आहे. तर दुसरीकडे राहुल वैद्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असून दोघही खूप छान दिसत आहेत.

नुकताच दिशा आणि राहुलचा गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत दिशा आणि राहुलचं औक्षण करून राहुलची आई त्या दोघांचे स्वागत करताना दिसत होती. दिशाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती या लूकमध्ये सुंदर दिसत होती. दुसरीकडे राहुलने देखील लाल रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्ट परिधान केला होता.

राहुल आणि दिशाचा हा पारंपरिक लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. राहुलने दिशा परमारला अनोख्या अंदाजात मागणी घातली होती. त्यानंतर दोघांनी सोशल मीडियाद्वारे लग्न करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. दरम्यान, राहुल ‘बिग बॉस १४’ नंतर कलर्सवरील स्टंट बेस शो ‘खतरो के खिलाडीच्या १२’ मध्ये दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.