Rajamouli’s Statement About God Hanuman & Ram : राजामौली दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या ते त्यांच्या महेश बाबू व प्रियांका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच रामोजी फिल्म सिटी येथे या चित्रपटासंबंधित मोठा कार्यक्रम पार पडला.
राजामौली यांच्या GlobeTrotter या कार्यक्रमादरम्यान देशभरातून त्यांचे चोहते मोठ्या संख्येने त्यांच्या आगामी चित्रपटाची झलक पाहण्यासाठी जमा झाले होते. परंतु, त्यावेळी तिथे तांत्रिक अडचण निर्माण झाली. यामुळे चित्रपटासंबंधित व्हिज्युल दाखवताना अडचण निर्माण झाली, त्यावेळी राजामौली यांनी उपस्थित प्रेक्षकांची माफी मागितली आणि अध्यात्माशी संबंधित त्यांचा अनुभव सांगितला.
राजामौलींची प्रतिक्रिया
राजामौलींनी त्यांचे वडील विज्येंद्र प्रसाद यांच्याशी संबंधित किस्सा सांगितला. यावेळी त्यांनी हनुमानाबद्दल वक्तव्य केलं. न्यूज १८ च्या वृत्तानुसार ते म्हणाले, “देवावर माझा फार विश्वास नाही, माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं की हनुमान मला पाठिंबा देत आहेत आणि आम्हाला ते मार्गदर्शन करत आहेत. मी ते ऐकताच मला खूप राग अनावर झालेला; की असं आम्हाला मार्गदर्शन करत आहे का?”
राजामौलींनी केलेलं हे वक्तव्य व्हायरल झालं आणि सोशल मीडियावर यासंबंधित अनेक प्रतिक्रिया यायला सुरू झाल्या. काहींनी पाठिंबा दिला तर काहींनी टीका केली, यामुळे त्यांचं २०११ सालचं जुनं ट्विटही व्हायरल झालं, ज्यामध्ये त्यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्य केलेलं. नेटकऱ्यांनी त्यांच्या ट्विटचे फोटो काढून त्यांच्यावर टीका केली, तर काहींनी राजामौलींनी या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण दिलेलं असंही म्हटलं. राजामौलींनी यासंबंधित असं स्पष्टीकरण दिलेलं की, “मला राम कधीच आवडले नाही, भगवान श्री कृष्ण माझे आवडते आहेत; त्यांचे सगळे अवतार मला आवडतात.”

राजामौलींनी GlobeTrotterच्या कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे ते वादाच्य भोवऱ्यात अडकले असून सोशल मीडियावर त्यांच्या आगामी चित्रपटावर बंदी आणा अशी मागणी होत आहे. परंतु, दुसरीकडे त्यांचे काही चाहते त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेण्यात आला असंही म्हणत आहेत. कार्यक्रमादरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींनंतर चित्रपटाचा टायटल टीझर प्रदर्शित करण्यात आला.
