Charu Asopa and Rajeev Sen Photos Viral : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. कधी दोघेही एकत्र दिसतात, तर कधी एकमेकांवर आरोप करताना दिसतात. अलीकडेच दोघांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये चारू तिच्या एक्स पतीकडे प्रेमाने पाहताना दिसत आहे.
राजीव सेन चारू असोपा आणि त्यांच्या मुलीबरोबर गणेश उत्सव साजरा करण्यासाठी बिकानेरला पोहोचला आहे. तिथून त्यांच्या पूजेचे अनेक फोटो समोर येत आहेत. दरम्यान, राजीव सेनने त्याची एक्स पत्नी चारू असोपाबरोबर काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत, तर कधी चारू तिच्या एक्स पतीकडे प्रेमाने पाहत आहे. राजीवने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेले नाही. कदाचित दोघेही त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी देण्याचा विचार करत आहेत. दोघांनीही यापूर्वी एकमेकांवर बरेच आरोप केले आहेत.
राजीव सेनने बिकानेरमध्ये मुलगी जियानाबरोबर गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळी त्यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. राजीवनं त्याच्या नवीन vlog मध्ये सेलिब्रेशनचे काही क्षण दाखवले आहेत. या सगळ्यामुळं ते दोघे कदाचित पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं चाहते म्हणत आहेत. त्यांच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, पण दोघांनी यावर मौन बाळगणच पसंत केलं आहे.
राजीव सेनच्या या पोस्टवर नेटकरीही खूप कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, दोघेही एकत्र चांगले दिसतात. दुसऱ्याने लिहिले, ते भांडतात पण तरीही एकत्र राहतात, वाईट नजर त्यांच्यावर पडू नये. तिसऱ्याने लिहिले, घटस्फोटानंतरही एकत्र असलेले असे जोडपे मी पहिल्यांदाच पाहिले आहे.” “त्यांना घटस्फोट म्हणजे खेळ वाटतोय,” असंही नेटकरी म्हणत आहेत.
चारू असोपाचे लग्न २०१९ मध्ये सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनशी झाले होते. त्यांची मुलगी जियानाचा जन्म २०२१ मध्ये झाला होता. दोघांनीही ८ जून २०२३ रोजी घटस्फोट घेतला. काही काळापूर्वी, आर्थिक अडचणींचे कारण देत चारू मुंबई सोडून बिकानेरला गेली. तिथं ती साड्या, ड्रेस विकतानाही दिसली होती. यावर राजीवनं ती ड्रामा करत असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्यानंतर आता पुन्हा ते रोमँटिक फोटो शेअर करत आहेत.