संजुबाबाच्या जीवनावर चरित्रपट

बॉलीवूडच्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आता अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित चरित्रपट बनवणार आहे.

बॉलीवूडच्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आता अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित चरित्रपट बनवणार आहे. सध्या या चित्रपटासाठीची प्राथमिक जुळवाजुळव सुरू असून पुढील वर्षी प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. चरित्रपटाच्या कथेवर काम सुरू असल्याची माहिती राजकुमार हिराणी यांनी पत्रकारांना दिली. या चित्रपटात संजुबाबाची भूमिका कोण साकारणार हा प्रश्न विचारला असता अजून चित्रपटातील कलाकारांची निवड होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या कथेचे काम पूर्ण झाल्यानंतर पात्रांच्या गरजेनूसार कलाकारांची निवड करण्यात येईल, अशी माहिती राजकुमार हिराणी यांनी दिली. सुरूवातीला संजय दत्तच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड होणार असल्याची चर्चा होती. मात्र, मी फक्त रणबीरशी कथेविषयी बोललो आहे. तो चित्रपटात काम करणार की नाही, याबाबत कोणतीही निश्चिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rajkumar hirani to start sanjay dutt biopic next year

ताज्या बातम्या