धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. पण त्याहीपेक्षा दर्जेदार अभिनयाने तिने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली. माधुरीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले, रुपेरी पडद्यावर तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आजही ती चित्रपट, वेबसीरिज तसेच रिएलिटी शो देखील करते. आपलं प्रत्येक काम जीव ओतून करणं ही तिची खासियतच आहे. माधुरीवर कितीही संकटं आली तरी आपल्या कामाला ती पहिलं प्राधान्य देते असं दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचं म्हणणं आहे.

राजकुमार संतोषी आणि माधुरी यांनी काही चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माधुरीबद्दल राजकुमार भरभरून बोलत होते. चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान माधुरीबरोबरचा अनुभव सांगताना राजकुमार संतोषी म्हणाले, “माधुरी आपल्या कामावर कधीच खाजगी आयुष्याचा परिणाम होऊ देत नाही. उटीमध्ये आम्ही एका चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना प्रॉडक्शनमधील एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला विचारलं आपण दुपारी अडीच वाजेपर्यंत पॅकअप करू शकतो का? कारण माधुरीला संध्याकाळी जायचं आहे. दुपारी मला कळालं की माधुरीच्या वडिलांच्या घरी छापा टाकण्यात आला आहे. इतकं टेन्शन असून देखील ती कॉमेडी सीनचं चित्रीकरण करत होती.”

आणखी वाचा – मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा, कान्स चित्रपट महोत्सवासाठी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची निवड

पुढे बोलताना ते म्हणाले, “त्यावेळी बंगळूरमधून मुंबईला जाण्यासाठी फ्लाइट होती. ३ ते ४ वाजता जरी आम्ही पॅकअप केलं असतं तरी माधुरीला बंगळूरमधून मुंबईमध्ये जावं लागलं असतं. आणि तिला यादरम्यान मुंबईमध्ये पोहोचायला रात्र झाली असती. इतकी अडचण निर्माण झाली असताना तिने दिग्दर्शकाला मात्र काहीच कळू दिलं नाही. ती चित्रीकरण करतच राहिली.”

आणखी वाचा – Photos : तेजस्विनी पंडितचे आजवरचे सगळ्यात हॉट लूक, मराठीमधील सर्वात बोल्ड सीरिजमध्येही करतेय काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माधुरी तिच्या कामाबाबत फार शिस्तबद्ध आहे. कितीही संकंट आली तरी ती डगमगून जात नाही. याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. माधुरीने नुकताच तिचा वाढदिवसही उत्साहात साजरा केला. वाढदिवसानिमित्त कलाविश्वातील अनेक मंडळींनी तिला भरभरून शुभेच्छाही दिल्या.