Maalik box office collection day 2 : आजकाल अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत; तर काही चित्रपट सरासरीपेक्षा कमी कमाई करत आहेत.
प्रेक्षकांना राजकुमार रावची प्रत्येक प्रकारची भूमिका आवडली. विशेषतः तो एका छोट्या शहरातील मुलाच्या भूमिकेत खूप चांगला होता.
या भूमिकांमध्ये त्याने प्रेक्षकांना हसवले आणि त्यांना घाबरवलेही. पण, राजकुमार रावचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘मालिक’ बॉक्स ऑफिसवर कमजोर ठरत आहे. त्याचे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन माहीत आहे का? चला जाणून घेऊया.
दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन
सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, ‘मालिक’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३.६७ कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने फक्त ३.७५ कोटी रुपये कमावले होते. आतापर्यंत राजकुमार रावच्या ‘मालिक’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन ७.४२ कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे बजेट ५४ कोटी रुपये आहे.
‘सुपरमॅन’मुळे ‘मलिक’ची खडतर वाटचाल
बॉलीवूड चित्रपट ‘मालिक’बरोबरच हॉलीवूड चित्रपट ‘सुपरमॅन’देखील प्रदर्शित झाला. भारतीय प्रेक्षकांना ‘सुपरमॅन’ जास्त आवडत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ७.६३ कोटी रुपये कमावले आहेत. याचा अर्थ हॉलीवूड चित्रपट ‘मालिक’पेक्षा दुप्पट कमाई करत आहे. एकंदरीत लक्षात घेतले, तर हॉलीवूड चित्रपट बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकत आहेत.
‘आँखों की गुस्ताखियाँ’
शनाया कपूरचा पहिला चित्रपट ‘आँखों की गुस्ताखियाँ’ ११ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ३० लाखांचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाला वीकेंडचा फायदा घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४३ लाख रुपये कमावले. अशा प्रकारे चित्रपटाने आतापर्यंत एकूण ७३ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. विक्रांत मॅसीने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
‘मालिक’ चित्रपटातील राजकुमार रावचा अभिनय प्रेक्षकांना आवडला; पण तो कमकुवत कथेला हाताळू शकला नाही. यापूर्वीही राजकुमार रावने ‘गँग्स ऑफ वासेपूर २’मध्ये एका गुंडाची छोटी भूमिका साकारली होती. त्यावेळी तो पूर्णपणे अॅक्शन शैलीत दिसला; पण कमकुवत कथेने राजकुमारच्या अभिनयाला मागे टाकले.
‘मालिक’ या चित्रपटात मानुषी छिल्लरदेखील आहे, जी राजकुमार रावच्या व्यक्तिरेखेच्या पत्नीची भूमिका साकारते. या चित्रपटात प्रोसेनजीत चॅटर्जीदेखील आहेत. त्यांचा अभिनयही चांगला आहे. ते बंगाली चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. हा चित्रपट पुलकितने दिग्दर्शित केला आहे.