प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातील आणि विदेशातील त्यांचे चाहते प्रार्थना करत होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “मी त्याच्याशी असहमत…” स्वरा भास्करने केले अक्षय कुमारबद्दल मोठे वक्तव्य

राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३  रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. बालपणी त्यांचे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते. त्यांना लहानपणापासूनच मिमिक्री आणि कॉमेडीची खूप आवड होती. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोमधून राजू श्रीवास्तव यांना ओळख मिळाली.  या शोच्या यशानंतर राजू यांनी मागे वळून पाहिलेच नाही. राजू श्रीवास्तव यांनी १९९३ मध्ये शिखा श्रीवास्तव यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि देशातील इतर राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला. राजू श्रीवास्तव यांची पत्नी,  मुलगा, मुलगी आणि जवळचे नातेवाईक  दिल्लीला असून राजू श्रीवास्तव यांच्यावर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : Raju Srivastav : हरहुन्नरी, निखळ कलावंत गमावला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju srivastav passed away at the age in 58 in delhi rnv
First published on: 21-09-2022 at 14:05 IST