बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रोज नवनवीन टास्क रंगत असतात. घरातल्या सदस्यांना रोज नव्या आव्हानांना, कठीण प्रसंगांना सामोर जावे लागत असते. मात्र तरीदेखील या साऱ्यावर मात करत घरातील सदस्य स्वत:ला या खेळामध्ये टिकून ठेवतात. घरामध्ये असे अनेक सदस्य आहेत, जे उत्तम टास्क खेळण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. त्यातील एक म्हणजे माधव देवचके. माधवला अभिनेत्री राखी सावंतने शुभेच्छा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हिंदी बिग बॉस हा शो २००६मध्ये सुरु झाला. या शोच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री राखी सावंत सहभागी झाली होती. ती टॉप-५ पर्यंत पोहोचली होती. नुकताच राखीने बिग बॉस मराठी पर्व दुसरेमधील स्पर्धक माधव देवचकेला घरात टिकून राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देत राखीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘माधव खुप चांगला माणुस आणि कलाकारही आहे. त्यामुळे त्याला भरघोस मत द्या आणि विजयी करा. माधव तू बिग बॉसच्या घरातून नॉमिनेट व्हायचे नाही. तू जिंकुनच बाहेर ये. माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा’ असे राखी व्हिडीओमध्ये बोलत आहे.