मध्यंतरी अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली होती. अभिनेत्री शरलीन चोप्राचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत त्यावरून पोलिसांनी कारवाई केली होती. शरलीन चोप्राने यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली होती. “आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे.” अशी पोस्ट करत याबद्दल तिने माहिती दिलेली.

मध्यंतरी राखी सावंतने यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळल्याची माहिती शरलीन चोप्राने दिली होती. दरम्यान, राखीविरोधात शरलीन चोप्रानेच तक्रार दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. शरलीन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ राखीनं पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. गेल्याच आठडव्यात राखीची आंबोली पोलिसांनी या प्रकरणाबाबत चौकशी केली होती.

आणखी वाचा : राखी सावंतने NGO ला भेट देऊन तिथल्या मुलांना वाटले ५०० रुपये; अभिनेत्री म्हणाली “दवा और दुआ…”

नुकत्याच हाती आलेल्या एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार राखीने सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिने आता उच्च न्यायालयात जायचं ठरवलं आहे. नुकतंच राखीने या अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायलयात धाव घेतल्याचं समोर आलं आहे. आता उच्च न्यायालयात तरी राखीच्या प्रकरणाची दखल घेऊन तिच्या बाजूने निकाल लागणार का हे येणारी वेळच ठरवेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी ही सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीवरून भरपूर चर्चा रंगली होती. राखी सावंत गरोदर असल्याचं बोललं जात होतं. विरल भयानी यांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राखी सावंत गरोदर असल्याचं स्वत: राखीने म्हटल्याचं नमूद केलं होतं. नंतर ही पोस्ट डिलीट झाल्याचं दिसून आलं. मात्र, या पोस्टमुळे राखी सावंतच्या गरोदरपणावर चांगलीच चर्चा रंगली.