दाक्षिणात्य अभिनेता राम चरण हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. राम चरणला प्राणी खूप आवडतात. रामला सगळ्यात जास्त श्वान आवडतात. राम चरणच्या घरी आता एका नव्या पाहुण्याच आगामण झालं आहे. राम चरणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे.

रामने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत राम त्याच्या श्वानासोबत दिसत आहे. या श्वानाचे नाव राइम असे ठेवण्यात आले आहे. राम त्याच्या कुटुंबातील या नवीन सदस्यासोबत खुश दिसत आहे. हा श्वान फरबॉल या प्रजातीचा आहे. हा श्वान खूप सुंदर दिसत आहे. रामजवळ आधीच जॅक रेसल टेरियर आहे. ज्याचे नाव त्याने ब्रॅट ठेवले आहे. आता त्याच्या या दोन्ही श्वानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा : “आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही…”,सलमान खानने केला त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा

आणखी वाचा : ‘इंग्रजी सुधारण्यासाठी लग्न केलं, असा मी एकटा क्रिकेटर नाही तर…’; वीरेंद्र सेहवागने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम लवकरच एसएस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात राम अल्लूरी सीतारामराजू या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ज्युनियर एनटीआर दिसणार आहे. एवढंच नाही तर या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील दिसणार आहे. या चित्रपटातून आलिया दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. सोबतच अजय देवगन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपच कधी प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.