“हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही” असं वक्तव्य दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याने काही दिवसांपूर्वी केलं होतं. हा वाद इतका पेटला की कलाविश्वातील मंडळींनी यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली. अजय देवगणने तर यावर आपलं ठाम मत मांडलं होतं. “हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आणि मातृभाषा होती, आहे आणि कायम राहिल.” असं अजयनं स्पष्टपणे सांगितलं होतं. अजयच्या वक्तव्यनंतर किच्चा सुदीपने “माझं म्हणणं तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेतलं, कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.” अशा आशयाचं एक ट्विट केलं. पण हा वाद वाढतच गेला.

हिंदी भाषेवरून वातावरण तापलं असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्माने या वादामध्ये उडी घेतली आणि ट्विट करत बॉलिवूडकरांना सुनावलं. आता पुन्हा एकदा राम गोपाल वर्माने एक ट्विट करत हा मुद्दा वर काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने अजय देवगण, अक्षय कुमारसह इतर अभिनेत्यांना एक आव्हान दिलं आहे.

marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या
Sangeet Natak Academy Award announced to veteran actor Ashok Saraf for his performance in the field of theatre
नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

राम गोपाल वर्मा काय म्हणाला?
“मी अजय देवगण, अक्षय कुमार, रणबीर कपूर, रणवीर सिंग, जॉन अब्राहम यांना आव्हान देतो की, यांनी त्यांचे हिंदी चित्रपट तेलुगू, कन्नड भाषेमध्ये डब करावेत. हिंदी चित्रपट तेलुगू, कन्नड भाषेमध्ये डब करून प्रभास, राम चरण, अल्लु अर्जून, यश या कलाकारांपेक्षा अधिक कमाई त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये करून दाखवावी.” अशाप्रकारचं ट्विट राम गोपाल वर्माने केलं आहे.

पुढे तो म्हणाला, “प्रभास, यश, अल्लु अर्जून, राम चरण या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं आणि हिंदी कलाकारांना मागे सारलं. ज्या हिंदी कलाकारांना यांनी मागे टाकलं यामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, रणबीर कपूर, रणवीर सिंग, जॉन अब्राहमचा समावेश आहे.”

आणखी वाचा – आलिया-रणबीरच्या शेजारीच अथिया बॉयफ्रेंडसह राहायला जाणार, खरेदी केलं महागडं घर?

राम गोपाल वर्माने स्वतः अजयबरोबर ‘भूत’, ‘कंपनी’सारखे चित्रपट केले आहेत. पण अजयवरच त्याने निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान यांचा समावेश त्याने या ट्विटमध्ये केला नाही. ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ२’ या चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर बराच धुमाकूळ घातला. यामध्ये बॉलिवूड चित्रपट चांगलेच आपटले.